उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये फिरण्यासाठी आहेत , हे सर्वात मनोरंजक व कमी खर्चिक पर्यटन ठिकाणं !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी  : उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये आपण जर फिरण्याचा विचार करत असाल तर , कमी खर्चांमध्ये मनोजरंक ठिकाणे नेमकी कोणकोणती आहेत ? याबाबत या लेखांमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत .

01.गोवा : गोवा हे पर्यटनाचे सर्वात मोठे प्रसिद्ध ठिकाण असून , या ठिकाणी देशातील इतर पर्यटनांपैकी 45 टक्के विदेशी पर्यटक येतात . ह्याचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे या ठिकाणी तेथील राज्य सरकारने विदेशी पर्यटनांसाठी त्यांच्या अनुरुप सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत .या ठिकाणी मद्यपी पर्यटक सर्वाधिक असतात , यामुळे येथील राज्य सरकारने मद्यावरील कर देखिल कमी करण्यात आलेला आहे . जेणेकरुन विदेशी व देशांतर्गत पर्यटकांची संख्या अधिक वाढण्यास मदत होते .उन्हाळा ऋतुमध्ये समुद्र किनारी थंड वातावरण असल्याने , अधिक मनोरंजक वाटते .

02.महाबळेश्वर : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणारे महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यांमध्ये स्थित आहेत .ह्या ठिकाणी कमी खर्च लागतो , यामुळे येथे ऑस्टेलिया , इंग्लंड , जपान अशा देशातील पर्यटक सर्वाधिक येतात . येथे कराड येथील धरण देखिल पर्यटनांसाठी प्रसिद्ध आहे .

03.सापुतारा : सापुतारा हे एक थंड हवेचे ठिकाण असून , हे ठिकाण गुजरात राज्यात स्थित आहेत .हे ठिकाण नाशिक जिल्ह्याशी लगत असल्याने अनेक महाराष्ट्रीयन या ठिकाणी  भेट देतात .येथे पर्यटनांसाठी अनेक सुविधा राज्य सरकारकडून उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत , येथे गार्डन , बोटींग , रोपवे , तसेच स्कॉय रायडिंग सारख्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत .

04.राज्याची पर्यटन राजधानी : छत्रपती संभाजीनगर येथे स्थित म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण देखिल जगप्रसिद्ध आहे , कारण पर्यटनांची राजधानी म्हणून प्रसिद्ध असणारे छत्रपती संभाजी नगर येथे अनेक जगप्रसिद्ध ठिकाण आहे . येथे जगप्रसिद्ध वेरुळ – अजिंठा लेण्या तसेच हनुमान मंदीर तसचे बिबिका मकबरा हे जगप्रसिद्ध ठिकाण आहेत , येथे विदेशी पर्यटक सर्वाधिक भेट देतात .

05.गड किल्ले : उन्हाळ्यांच्या सुट्टीमध्ये गड किल्ले पाहायचे असल्यास , सिंदुधदुर्ग , मुरुड जुंजिरा ,प्रतापगड , राजगड , रायगड , देवगिरी , पन्हाळा , शिवनेरी , साल्हेर हे किल्ले पर्यटनांसाठी अधिक पर्यटनशील असणार आहेत .

Leave a Comment