शासनांच्या गट ब व गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1377 जागेकरीता महाभरती ; नोकरीची सुवर्णसंधी !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आपण जर सरकारी विद्यालयांमध्ये नोकरी करु इच्छित असाल , तर नवोदय विद्यालय समितीमध्ये विविध पदांच्या गट ब आणि गट क संवर्गातील पदांच्या तब्बल 1377 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत , आवेदन सादर करण्याची शेवटची दिनांक 30 एप्रिल 2024 पर्यंत असणार आहे .

यांमध्ये गट ब संवर्गातील पदे : यांमध्ये गट ब संवर्गात महिला स्टाफ नर्स , सहाय्यक सेक्शन अधिकारी , ऑडीट सहाय्यक , विधी सहाय्यक , स्टेनोग्राफर अशा एकुण 166 पदांसाठी सरळसेवा पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

गट क संवर्गातील पदे : गट क संवर्गामध्ये संगणक ऑपरेटर , केटरिंग सुपरवायझर , कनिष्ठ सचिवालय सहाय्यक , इलेक्ट्रिशियन कम प्लंबर , प्रयोगशाळा परिचर , मेस मदतनिस , मल्टी टास्किंग स्टाफ अशा संवर्गातील एकुण 1211 जागांसाठी सरळसेवा पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अर्ज कोण करु शकेल  ? : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणतीही पदवी / बी कॉम / पदव्युत्तर पदवी / एल एल बी / 12 वी / 10 वी / 10 वी + आयटीआय / टायपिंग अर्हता / बी.सीए / बी.एस्सी सी अर्हता पदांनुसार उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

परीक्षा शुल्क :

पद क्र.011500/- खुला / ओबीसी प्रवर्ग करीता
पद क्र.02 ते 14 करीता1000/-  खुला / ओबीसी प्रवर्ग करीता
वरील सर्व पदांकरीता500/- मागास / अपंग प्रवर्ग करीता

आवेदन सादर करण्याची पद्धत : सदर पदांकरीता ऑनलाईन पद्धतीने 30 एप्रिल 2024 पर्यंत https://nvs.ntaonline.in/instruction  या वेबसाईटवर अर्ज सादर करु शकता ..

याबाबत सविस्तर जाहीरात ( PDF ) पाहण्याकरीता CLICK HERE

Leave a Comment