Khushi Pawar ( Gold Rate News ) : सोने खरेदीदारांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे . सोन्यामध्ये केलेली गुंतवणुकी ही सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते .
भारताने काल दिनांक 07 मे रोजी केलेल्या हवाई हल्ला ( सर्जिकल स्ट्राईक ) ऑपरेशन सिंदुर अंतर्गत पीओके मधील 9 दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले , यांमध्ये 80 पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त समोर येत आहे .
सध्याच्या आकडेवारीनुसार सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसून येत आहेत . सध्याची भारतातील युद्धजन्य परिस्थिती तसेच जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण होण्याचे संकेत आहेत .
सध्याचे दर : दिनांक 07 मे रोजी 24 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅम ( प्रति तोळा ) 96,890/- रुपये इतका होता , तर 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम ( प्रति तोळा ) 88,750/- रुपये इतका भाव होता . तर 18 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅम ( प्रति तोळा ) 69250/- इतका होता .
सोने व शेअर मार्केटमधील विरोधी गुंतवणूक : शेअर बाजार घसरल्यास गुंतवणुकदार सोन्यामध्ये गुंतवणुक करतात , तर शेअर बाजार वधारल्यास गुंतवणूकदार हे सोन्यातील गुंतवणूक काढून शेअर बाजारांमध्ये गुंतवणूक करतात .
हे पण वाचा : महावितरण अंतर्गत 187 जागेसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
मागील 6 महिन्याचे जागतिक पातळीवर होणारे आर्थिक स्थिती लक्ष्यात घेता , सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे . परंतु हळूहळू सदर स्थिती निवारत असल्याने , सोन्याच्या किंमतीत घट होवून , परत एकदा शेअर बाजार वधारणार आहे .
सोन्याचे भावामध्ये 10 हजार रुपयांची होणार घसरण : सध्याची जागतिक पातळीवरील होणारे आर्थिक परिणाम तसेच भारत – पाकिस्थान युद्धाची लक्षात घेता , सोन्याच्या किंमतीमध्ये 10 हजार रुपयांची घसरण होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !