Marathi Prasar @admin : राज्यातील विद्यार्थीनींना येत्या जुन महिन्यांपासून मोफत उच्च शिक्षण देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे . या निर्णयामुळे राज्यातील मुलींना उच्च शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारीच फीस आकारली जाणार नाही . याबाबतची अधिकृत्त घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे .
यांमध्ये मुलींना येत्या जुन महिन्यांपासुन अभियांत्रिकी , वैद्यकीय तसेच तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांसह इतर अभ्यासक्रमांना कोणत्याही प्रकारची फीस आकारण्यात येणार नाहीत , अशी माहीती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे .उत्तर महाराष्ट्रातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षण शास्त्र विभागाच्या इमारतीचे आणि नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या ,
योगशास्त्र पदव्युत्तर विभागाचे उद्घाटन केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना संवाद साधताना मुलींना उच्च शिक्षण हे माहे जुन 2024 पासून मोफत करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली . यांमध्ये जवळपास 800 अभ्यासक्रमांसाठी मुलींना उच्च शिक्षणांसाठी फीस आकारली जाणार नाही . यांमध्ये प्राधान्याने व्यवसायिक अभ्यासक्रमांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे .
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढते प्रमाण यामुळे ही घोषणा करण्यात येत असल्याची माहिती देखिल देण्यात आलेली आहे .या निर्णयामुळे राज्यातील गरिब , गुणवंत विद्यार्थीनींना उच्च शिक्षणांसाठी कोणत्याही प्रकारची फीस भरावी लागणार नाही .
परभणी जिल्हामधील एका विद्यार्थीनी आत्महत्या केल्याच्या घटनेची दखल राज्याचे मुख्यमंत्री यांनी घेतल्यानंतर , विद्यार्थीनींना शुल्क माफी विषयक चर्चा करण्यात आलेली होती , सदर बाबींचा विचार करुनच राज्य शासनांकडून पुढील शैक्षणिक वर्षांपासून उच्च शिक्षणांसाठी विद्यार्थीनींना मोफत उच्च शिक्षणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे .