@marathi Prasar बालाजी पवार प्रतिनिधी : आपण जर शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करु इच्छित असाल तर , मार्केटमधील काही शेअर मध्ये नियमित पणे दिर्घ कालवधी करीता गुंतवणूक केल्यास आपणांस निश्चितच फायदा होईल . यांमध्ये काही शेअर सरकारी कंपनीचे सर्वाधिक जोखिम मुक्त शेअर असतात . यामुळे सरकारी कंपन्यांच्या शेअर मध्ये गुंतवणुक करणे अधिक सोयिस्कर ठरते .
LIC (भारतीय आयुविमा कंपनी ) : LIC चे IPO लाँच झाला होता , त्यावेळी लिस्टींगमध्ये अनेकांना तोटा सहन करावा लागला होता , कारण आयपीओ हा निर्धारित किंमतीपेक्षा कमी किंमतीस लाँच झालेला होता . परंतु एसआयसीमध्ये बऱ्याच लोकांना गुंतवणुक केलेली होती , खास करुन सर्वसामान्य पॉलीसी धारकांनी देखिल या शेअरमध्ये गुंतवणुक केलेली होती . यामुळे या शेअरमध्ये केलेली गुंतवणूक ही अधिक फायदेशिर आहे . हा शेअर आज 1070/- रुपयाला क्लोज झाला आहे . तर 1000/- रुपयाला ओपन झालेला होता . यामध्ये नियमित गुंतवणुक केल्यास आपणांस भविष्यात निश्चित सर्वाधिक फायदा होईल .
Indian Railway Finance Corp. – ही कंपनी भारतीय रेल्वेला विविध कामकाज नविन प्रोजेक्ट तयार करणे , रेल्वे स्थानके तसेच डब्बे तयार करणे इ. कामकाजासाठी वित्त पुरवठा करण्याचे कामकाज करीत असते . यामुळे ही कंपनी नेहमीच फायद्यात असणार आहे . या शेअर मध्ये जास्त मुदतीकरीता गुंतवणुक करणे अधिक फायद्याचे ठरणार आहेत . या शेअरची आज दिनांक 14.02.2024 रोजीची किंमत ही 154.30/- रुपये एवढी आहे . तर या शेअरने आत्तापर्यंत 192.80/- रुपये एवढी कमाल किंमत गाठली होती , त्यानंतर किंमत घसरली आहे . या कंपनीचे फंडामेंटल पाहीले असता , या शेअरमध्ये गुंतवणुक करणे अधिक फायद्याचे ठरणार आहेत .
SBI : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ही सरकारी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असून , या बँकच्या शेअरच्या किंमतीचा विचार केला तर सन 2023 मध्ये या शेअरची सर्वसाधारण किंमत ही 550/- रुपये अशी होती तर या शेअरमध्ये माहे जानेवारी 2024 पासुन 100/- रुपयांची वाढ झाली , तर सध्या या शेअरची किंमत ही 743.40/- रुपये एवढी आहे . म्हणजेच एका वर्षांमध्ये या शेअरने 37.61 टक्के इतकी वाढ झालेली आहे . तर भविष्यात देखिल या शेअरमध्ये ग्रोथच दिसेल , यामुळे यांमध्ये गुंतवणुक करणे अधिक सोयीस्कर असणार आहेत .
खाजगी क्षेत्रांमधील सर्वाधिक फायदेशिर शेअर : खाजगी क्षेत्रामधील शेअर पाहीले असता , ॲक्सिस बँक , एचडीएफसी बँक , टाटा पावर , टाटा स्टिल , मारुती सुझुकी , बजाज ॲटो , अडानी ग्रीन एनर्जी ह्या शेअरमध्ये गुंतवणुक करणे अधिक फायदेशिर ठरेल , तर मिड टाईप शेअर MRF हे शेअर अधिक फायदेशिर ठरणार आहेत . तसेच IDFC First Bank ,SJVN , SUZLON Energy ह्या शेअरचा विचार केला असता सातत्याने किंमतीमध्ये वाढ होत आहे . यामुळे या शेअर मध्ये गुंतवणुक करणे फायदेशिर ठरेल .