@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Finally, dearness allowance at the rate of 53% has been implemented for state employees. ] : अखेर राज्य कर्मचाऱ्यांना 53 टक्के दराने महागाई भत्ता वाढ लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागाकडुन दिनांक 25.02.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार , नमुद करण्यात आले आहेत कि, राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पुर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असणारा महागाई भत्ताच्या दरात अखेर सुधारणा करण्याच्या प्रश्नावर निर्णय घेण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार असे आदेश देण्यात येत आहेत कि, दि.01.07.2024 पासुन सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय असणारा महागाई भत्ताचा दर हा 50 टक्के वरुन 53 टक्के इतर करण्यात येत आहे . सदर महागाई भत्ता वाढ ही दिनांक 01.07.2024 ते दिनांक 31.01.2025 या कालावधीतील महागाई भत्ता थकबाकीसह माहे फेब्रुवारी , 2025 च्या वेतना सोबत रोखीने देण्याचे निर्देश देण्यात येत आहेत .
तसेच डी.ए ची रक्कम प्रदान करताना विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रमाणे यापुढे लागु राहतील असे नमुद करण्यात आले आहेत . तसेच यावर होणारा खर्च हा शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन / भत्ते लेखाशीर्ष खाली खर्ची टाकण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
महागाई भत्ता वाढ बाबत GR डाऊनलोड करा
तसेच अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या संदर्भात संबंधित प्रमुख लेखाशिर्षाखालील ज्या उप – लेखाशिर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याकरीता माहिती उपलब्ध करुन देण्याचा परिपत्रक व नमुना !
- भाजपाच्या प्रचंड विरोधानंतरही मुस्लिमांना अखेर 4% आरक्षण ; विधानसभेत मंजुरी – जाणुन घ्या सविस्तर माहिती !
- दिनांक 25 मार्च पर्यंतचा हवामान अंदाज : राज्यात या भागात पडणार अवकाळी पाऊस !
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025