@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ farmer help instraction to all district collector ] : राज्यातील सर्व जिल्हा प्रशानांस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निर्देश दिले आहे कि , दिनांक 30 जुन 2024 पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत वाटप प्रक्रिया पुर्ण करावेत .
राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती तसेच शेती नुकसान भरपाई याकरीता झालेल्या नुकसानीची भरपाई करीता मदतीचे वाटप दिनांक 30 जुन 2024 पर्यंत करण्यात यावेत .शेतकऱ्यांना मदत निधी वेळेवर मिळायला पाहिजे याकरीता , राज्यातील सर्व जिल्हा प्रशासन विभागांना निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत .
त्याचबरोबर बियाणे , खते यांची लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यांवर देखिल कठोर कारवाई करण्याचे निर्देश मा.मुख्यमंत्रांकडून देण्यात आलेले आहेत . काल दि.25 जुन रोजी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीमध्ये खरीप हंगामाचा आढावा घेण्यात आला असून , सदर बैठकीचा राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री , महसूलमंत्री , सहकार मंत्री तसेच कृषी मंत्री तसेच मृदा व जलसंधारण मंत्री तसचे राज्याचे मुख्य सचिव सह संबंधित विभागाचे अपर मुख्य सचिव उपस्थित होते .
यावेळी मा.एकनाथ शिंदे संबोधित करीत असताना म्हणाले कि , शेतकरी हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे , म्हणून सरकारकडून शेतकऱ्यांच्या समृद्धी करीता घेण्यात आलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच यावेळी संबोधित करताना सांगितले कि , राज्यातील कृषी विद्यापीठांनी नविन संशोधनावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच राज्यांमध्ये ज्या भागात कमी पाऊस ( 25 टक्क्यांपेक्षा कमी ) झालेला आहे , अशा तालुके तसेच जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याच्या सुचना देण्यात आलेले आहेत . तसेच खरीप हंगामांमध्ये शेतकऱ्यांना बीयाणे तसेच खते व अन्य कृषी घटकांची तुटवडा भासू नये याकरीता राज्य कृषी विभागांकडून संपुर्ण नियोजन करण्यात आलेले आहेत . तर बियाणे , खतांची साठेबाजी अथवा लिंकिंग होत असल्यास , त्या बाबतची तक्रार 9822446655 या व्हॉट्सॲप क्रमांवर मॅसेज करण्याचे आव्हान कृषीमंत्री श्री.धनंजय मुंडे यांच्याकडून यांच्याकडून करण्यात आले आहेत .
-
नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pay matrix of the new Pay Commission has been finalized. ] : आठवा वेतन आयोगांमध्ये कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या वेतन / पेन्शनमध्ये 20 ते 35 टक्के पर्यंत वाढ होवू शकते . सदर पगार वाढ ही दि.01.01.2026 पासुन सुधारित वेतनसंरचना नुसार लागु करण्यात येणार आहेत . ज्यामध्ये वेतन फरक…
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 05 major important Government Decisions (GR) issued on 19.01.2026 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना : महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट ब / सहायक आयुक्त , गट ब संवर्गातुन…
-
राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR issued on 17.01.2026 regarding increase or reduction of retirement age of state employees by 02 years ] : सेवानिवृत्तीचे वय 02 वर्षांनी कमी करणेबाबत राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागाकडून दि.17.01.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहे…