@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ girl right in father and husbands properties ] : मुलगी ही आई , सुन , सासु अशा प्रकारचे अनेक भुमिका मांडत असते , त्यांस आपले स्वत : वेगळे अस्तित्वत नसते , माहेरी असताना , वडीलांच्या नावे तर सासरी गेल्यास पतीच्या नावे ओळखली जाते . यापुर्वी महिलांना संपत्तीचे अधिकर खुपच कमी होते , परंतु आता महिलांना सासरी व माहेरच्या संपत्तीमध्ये मोठे अधिकार आहेत .
वडीलांच्या संपत्तीमध्ये अधिकारी असतो का ? : महिलांना आपल्या वडीलांच्या संपत्तीमध्ये सन 2005 च्या सुधारित हिंदु वारसा कायद्यानुसार महिलांना आपल्या वडीलांच्या संपत्तीमध्ये मुलांप्रमाणेचे समान अधिकार देण्यात आले आहेत . तर सदर कायद्यांमध्ये सन 2020 मध्ये झालेल्या सुधारणेनंतर , महिलांना वडिलोपार्जित संपत्तीमध्ये देखिल मुलांप्रमाणे समान अधिकारी मिळाले आहेत , तर विवाहीत मुलगी देखिल अशा प्रकारच्या संपत्ती हक्कदार ठरेल .
सासरच्या संपत्ती किती अधिकार असतो ? : मुलगी लग्नानंतर आपले वडीलांचे सर्व घरदार सोडून सासरी आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करते . यामुळे सासरच्या संपत्ती मध्ये देखिल महिलांना लग्नानंतर अधिकार देण्यात आलेले आहेत . लग्नानंतर पतीच्या संपत्तीमध्ये पत्नीचा अधिकार असतो , तर पतीच्या निधनानंतर पतीची सासऱ्याकडील वडीलोपार्जित संपत्तीवर अधिकर असतो .याबाबत हिंदु वारसा कायद्यामधील कलम 8 मध्ये नमुद आहेत .
जर वडीलांसोबत मुलींना नातेसंबंध ठेवायचे नाहीत , अशा वेळी वडीलांची प्रौढ मुलीच्या खर्चाची जबाबदारी नसेल , परंतु वडीलांच्या मृत्युनंतर वडीलांच्या संपत्तीवर कायदेशिर हक्क मिळेल . परंतु या प्रकरणी मुलगी ही प्रौढ म्हणजेच वयाचे 18 वर्षे पुर्ण झाले असणे आवश्यक असेल .
परंतु वडीलांने जर त्याच्या मृत्यपत्रांमध्ये आपली नावे असणारी संपत्ती मुलाच्या नावे , सुनेच्या नावे , मित्रांच्या नावे किंवा अन्य कोणत्याही संस्थेच्या नावे केल्यास , अशा प्रकरणे सदर संपत्तीवर मुलगी आपल्या वडीलांच्या संपत्तीवर हक्क सांगु शकत नाही . अशा नियमांमुळे महिलांना माहेरी व सासरच्या संपत्तीमध्ये अधिकार असल्याने , महिलांना सुरक्षा प्रदान होत जात आहेत .
-
शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याकरीता माहिती उपलब्ध करुन देण्याचा परिपत्रक व नमुना !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Circular and form to provide information to teachers for registration for senior and selected category in-service training ] : वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता माहिती उपलब्ध करुन देणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत मा.आयुक्त आदिवासी विकास विभाग , महाराष्ट्र राज्य नाशिक…
-
भाजपाच्या प्रचंड विरोधानंतरही मुस्लिमांना अखेर 4% आरक्षण ; विधानसभेत मंजुरी – जाणुन घ्या सविस्तर माहिती !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Despite huge opposition from BJP, 4% reservation for Muslims finally ] : भारतीय जनता पार्टीच्या प्रचंड विरोधानंतरही मुस्लिम समुदायाला 4 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्तावाला अखेर मंजुरी देण्यात आली आहे . कर्नाटक विधानसभेत या संदर्भात निर्णय घेतला असून , या राज्यात आता मुस्लिम समुदायाला 4 टक्के आरक्षण लागु करण्यात…
-
दिनांक 25 मार्च पर्यंतचा हवामान अंदाज : राज्यात या भागात पडणार अवकाळी पाऊस !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Weather forecast till March 25: Unseasonal rains will fall in these parts of the state ] : दिनांक 25 मार्च 2025 पर्यंत राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . या काळातील सविस्तर हवामान अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . राज्यांमध्ये सध्या वातावरणात अचानक बदल होताना दिसून…