@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Employees will get these 3 important benefits with the Eighth Pay Commission ] : सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करण्यास मंजूरी दिलेली आहे , याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना 03 मोठे महत्वपुर्ण लाभ दिले जाणार आहेत .
18 महिने महागाई भत्ता थकबाकी : मिडीया रिपार्टच्या प्राप्त माहितीनुसार , सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना कोरोना काळातील 18 महिन्यांचे रोखण्यात आलेली डी.ए थकबाकीचा लाभ अनुज्ञेय करणेबाबत , केंद्र सरकार अनुकुल असल्याचे सांगण्यात येत आहेत . कारण याबात सध्य स्थितीत विविध न्यायालयात याचिका सुरु आहेत , यामुळे याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे .
वाढीव घरभाडे भत्ता ( HRA ) : सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग प्रमाणे 50 टक्के पेक्षा अधिक डी.ए वाढ झाल्यास , घरभाडे भत्ता मध्ये सुधारणा करण्याचे निर्देश आहेत . यामुळे सध्या महागाईचे दर 50 टक्के पेक्षा अधिक झाल्याने , घरभाडे भत्ता मध्ये देखिल सुधारणा करण्याचा निर्णय येत्या अर्थसंकल्पांमध्ये होण्याची शक्यता आहे .
महागाई भत्ता ( DA ) : सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना माहे जानेवारी 2025 मधील डी.ए वाढीचा निर्णय देखिल येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे . यामुळे केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांचा एकुण डी.ए मध्ये आणखीण 03 ते 04 टक्क्यांची वाढ होईल .
वरील 03 लाभ केंद्र सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना लागु करण्यात येणार आहेत , ज्यामुळे एकुण वेतन / पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे .
- काही महत्वपुर्ण चालु घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- NPS धारक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय ; पाहा सविस्तर !
- राज्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात मिळणार हे 3 लाभ ; जाणून घ्या सविस्तर !
- अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी करण्यात आल्या या 10 महत्वपुर्ण घोषणा ; जाणून घ्या सविसतर !
- राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्षे करण्याची परत एकदा मोठी मागणी ; मंत्रीमंडळ निर्णयासाठी शिफारस !