कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणेबाबत निधी वितरण शासन निर्णय दि.28.01.2025

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ employee payment anudan shasan nirnay ] : कर्मचारी वेतन करीता अनुदान निधी वितरण करणेबाबत राज्य शासनांच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग मार्फत दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण जिआर निर्गिमित करण्यात आला आहे .

सदरच्या शासन निर्णयानुसार राज्यातील इतर मागास प्रवर्ग , विमुक्त जाती तसेच भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांकरीता सुरु करण्यात आलेल्या सरकारी वसतिगृहात कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याकरीता निधीचे वितरण करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .

राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 100 विद्यार्थी क्षमता असणाऱ्या मुलांसाठी 1 तर मुलींकरीता 01 या प्रमाणे 36 जिल्ह्याच्या ठिकाणी 72 शासकीय वसतिगृहे अस्तित्वात आहेत . सदर वसतिगृहात कार्यरत असणाऱ्या बाहृय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे वेतन देयके भागविण्यासाठी निधीची उपलब्धता सदर शासन निर्णय करण्यात आलेली आहे .

सदरची देयके हे अनुसूचित जाती , अनुसुचित जमाती , इतर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक यांचे कल्याण , मागासवर्गीय यांचे कल्याण , शिक्षण वसतिगृहे , मॅट्रीकोत्तर शिक्षण , इतर मागास वर्ग , विमुक्त जाती , भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भाड्याने वसतिगृहे , कंत्राटी सेवा या लेखाशिर्षाखाली निधी वितरण करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .

Leave a Comment