भारतात लॉन्च होणार नवीन धमाकेदार इलेक्ट्रिक स्कूटर; 10.25 स्क्रीन डॅशबोर्ड सह मिळणार अनेक फीचर्स  पहा !

Spread the love

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्या व्यक्तींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही स्वतः भविष्यात इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे.खरं तर अलीकडे भारतीय बाजारांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी खूप वाढलेले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांचे लक्ष हे इलेक्ट्रिक स्कूटरने वेधून घेतलेले आहे.

पेट्रोल स्कूटर वापरण्याऐवजी जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर वापरली तर तुमची भरपूर प्रमाणात पैशाची देखील बचत होते आणि विशेष म्हणजे भारतीय बाजारांमध्ये अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च सुद्धा केलेल्या आहेत.

यामध्येच आता भारतीय बाजारांमध्ये तैवांच्या ऑटोमोबाईल कंपनीकडून एक नवीन स्कूटर लॉन्च केली जाणार असल्याचे वृत्त समोर आलेले आहे.गोगोरो कंपनी लवकरच भारतीय बाजारांमध्ये गोगोरो पल्स ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार ही नवीन गाडी तीन सेकंदामध्ये 0 ते 50 किलोमीटरचे स्पीड देखील पकडते.

या गाडीची रेंज किती असणार आहे याबाबत कोणतीही माहिती आतापर्यंत समोर आलेले नाही. परंतु ही गाडी जून 2024 पर्यंत सर्वसामान्यांसाठी लॉन्च केली जाणार आहे अशी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान आता आपण या गाडी विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया.

कशी असणार डिझाईन : या येणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये मॅट्रिक्स एलईडी हेडलाईट दिली जाणार असून ही हेडलाईट क्लस्टर मध्ये तेरा समांतर एलईडी युनिटचा समावेश केलेला आहे.

गोगोरो पल्स मध्ये एअर कोल्ड हायपर ड्रायव्हर एच वन मोटर देखील राहणार आहे जी लिक्विड कोल्ड सिस्टमने सुसज्ज राहील असा देखील दावा करण्यात आलेला आहे.ही मोटर 11000 आरपीएम वर नऊ किलोवाट पावर वितरित करण्याची क्षमता ठेवते. ही स्कूटर फक्त आणि फक्त 3.05 सेकंदात 0 ते 50 किलोमीटर ताशी पर्यंत स्पीड पकडण्याचा दावा देखील करते.

सुरक्षिततेसाठी स्कूटरमध्ये ट्रॅक्शन वैशिष्ट्य देखील आहे आणि रायडिंग साठी रेंज, डर्त, सिटी, ट्रेकिंग, टुरिंग आणि कस्टम असे सहा मोड देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे.त्यामुळे या गाडीने आरामदायी प्रवास देखील करता येईल कंपनीच्या इतर मॉडेल्सच्या विपरीत त्याची सीट ही थोडीशी लहान असणार आहे.

त्याचवेळी फुटपेग बॉडी पॅनल मध्ये मॅच होत आहेत आणि या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 10.25 इंच टच स्क्रीन असलेले डॅशबोर्ड आपल्याला पाहायला मिळणार आहे.या शिवाय या गाडीमध्ये इतर अनेक भन्नाट फीचर्स असणार आहेत या गाडीच्या किमती बाबत बोलायचे झाले तर याची किंमत दोन लाख रुपयांच्या आसपास असेल असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.

Leave a Comment