@Marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी : आजच्या आधुनिक युगांमध्ये आपण घरी बसल्या , फक्त मोबाईलचा वापर करुन लाखो रुपये कमाई करण्याचे अनेक प्रभावी साधने उपलब्ध झालेले आहेत . पुर्वीच्या काळांमध्ये ऑनलाईन पद्धतीने कमाई करण्याचे खुपच कमी स्त्रोत होते , परंतु आता मोठ्या प्रमाणात स्त्रोत उपलब्ध आहेत .
युट्युब व्हिडीओ ( You Tube ) : जगांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारे युट्युबच्या माध्यमातुन आपण केवळ व्हिडिओ पाहू शकतो , असे नाही . तर आपण देखिल युट्युबच्या माध्यमातुन कमाई करु शकतो . भारतांध्ये अनेक युट्युबर आहेत , ज्यांची कमाई ही करोडो मध्ये आहे . यांमध्ये अमीत बडाना , खान सर ( एज्युकेशन चॅनल ) असे अनेक उदाहरण आहेत . ज्यांची कमाई ही करोडोमध्ये आहे .
युट्युबच्या माध्यमातुन पैसे कमविण्यासाठी आपणांस आपले स्वत : चे व्हिडिओ तयार करुन युट्युबवर अपलोड करावे लागते , यांमध्ये आपल्या चॅनेलचे Subscriber हे 1000 झाले पाहिजेत , तर 4 हजार वॉच टाईम पुर्ण केल्यानंतर आपले चॅनेल हे पैसे कमाविण्याची पात्रता पुर्ण करेल , व त्यानंतर व्हिडीओ ग्रोथ / येणारे ॲड्स यांच्या माध्यमातुन पैसे मिळतात .
ब्लॉगिंग ( Blogging ) : जर आपण ऑनलाईन पद्धतीने लेख , ब्लॉग लिहून कमाई करु शकता . यासाठी आपणास प्रथम डोमेन ,होस्टिंग घ्यावी लागते . अर्थात आपणांस ऑनलाईन संकेतस्थळ तयार करुन त्यांमध्ये लेख , ब्लॉग , बातम्या पब्लिश करावे लागते . ज्यांमध्ये संकेतस्थळ हे गुगल ॲडसेंस कंपनीकडून मॉनिटाईज झाल्यानंतर गुगल कंपनीकडून जाहीराती प्रसिद्ध करण्यात येतात . किती ॲड आले व किती ॲड्सवर क्लिक झाले , यानुसार कमाई निश्चित करण्यात येते .
ऑनलाईन ट्रेडिंग : आजकाल अनेक जण शेअर मार्केट ट्रेडिंग करुन कमाई करीत आहेत , यांमध्ये आपले डी-मॅट खाते असणे आवश्यक असते . शेअर मार्केट मध्ये डेली इन्ट्राडे , डिलिव्हरी तसेच ऑप्शन / फ्युचर मध्ये शेअरची खरेदी – विक्रि करुन ट्रेडिंगच्या माध्यमातुन पैसे कमाऊ शकता .