पर्सनल लोन घेण्याआधी या गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर होईल मोठे नुकसान; पहा महत्त्वाची बातमी !

Spread the love

@marathiprasar बालाजी पवार प्रतिनिधी : जीवनामध्ये प्रत्येकाला कुठल्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती येथेच किंवा जास्त पैशाची आवश्यकता ही भासते अशावेळी आपल्याकडे कोणतीही शाश्वती नसते.अशा आर्थिक अडचणीच्या वेळेस आपण बँकेकडे कर्जाची मागणी करायला जातो किंवा कर्जासाठी अर्ज करत असतो. यामध्ये भरपूर लोक पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्जासाठी अर्जाची मागणी करतात किंवा अर्ज भरतात.

खाली दिलेले नियम व अटी पूर्ण केल्याशिवाय तुम्ही वैयक्तिक कर्ज घेऊ शकणार नाही व तसेच अशा प्रकारच्या वैयक्तिक कर्जाकरिता तुम्ही अगोदर कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे या संबंधित आपण या लेखांमध्ये माहिती जाणून घेणार आहोत.या गोष्टी तुम्हाला पर्सनल लोन साठी महत्वाच्या ठरतील त्या पुढीप्रमाणे पाहुयात ..

१) निश्चित उत्पन्नाच्या साधनाचा विचार करणे:-तुम्ही जेव्हा कुठल्याही वित्तीय संस्थेकडे किंवा बँकेकडे कर्ज घेण्यासाठी जाता आणि अर्ज करता. तेव्हा या संस्था किंवा बँक तुमचे उत्पन्न किती आहे हे पाहते. त्यामध्ये तुमचा आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत हा स्थिर असेल का नाही हे पाहिले जाते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नोकरी लवकरात लवकर सोडणे टाळावे तसेच स्थिर उत्पन्न मिळवू शकता याची देखील तुम्ही खात्री करणे गरजेचे आहे.

२) क्रेडिट स्कोर पाहणे गरजेचे आहे :- तुम्ही कर्जाची मागणी करण्याच्या अगोदर तुमचा क्रेडिट स्कोर तपासून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामध्ये तुम्ही जर अगोदर कोठे कर्ज घेतले असेल आणि ते वेळेवरती भरले असेल तर तुमचा क्रेडिट स्कोर हा चांगला मानला जातो. बँकेकडून तुम्हाला वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर तुमचा क्रेडिट स्कोर हा 700 पेक्षा जास्त असलाच पाहिजे. जर तुमचा क्रेडिट स्कोर याच्याखाली असेल तर तुम्हाला लोन घेण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते.

३) खर्चाचे योग्यरीत्या नियोजन करणे :- यामध्ये तुमचे उत्पन्न किती आहे आणि तुमचा खर्च किती प्रमाणात आहे याचे नियोजन लावणे खूप गरजेचे आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या वित्तीय संस्थेकडे किंवा बँकेकडे कर्ज मागण्यासाठी जातात आणि तेथे अर्ज करता तेव्हा तुमचा खर्च आणि काही कर्ज घेतले आहे काय हे देखील त्या संस्थेकडून पाहिले जाते. मग त्यामधून तुमच्या उत्पन्नामधून खर्च वजा करून किती शिल्लक राहतात हे सुद्धा पाहिले जाते.

४) वेगवेगळ्या बँकेच्या व्याजारांची तुलना करावी :- प्रत्येक बँकेचे वैयक्तिक कर्जावरील व्याजदर हे वेगवेगळे असते आणि त्यामुळे कर्जासाठी विचारणा करताना फक्त एकाच ठिकाणी न जाता सर्वत्र जाऊन त्या बँकांचा व्याजदर तपासुन त्यांचे मूल्यांकन करणे हे अत्यंत गरजेचे आहे.

Leave a Comment