राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ मार्फत इको बाप्पा ॲप्सचे लोकार्पण ; सविस्तर वृत्त पाहा .

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ eco bappa apps launch ] : यंदाच्या वर्षी राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ मार्फत इको बाप्पा हे मोबाईल ॲपचे राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहेत .यामुळे पर्यावरण व वातावरण पर्यावरणपुरक राहण्यास मदत होणार आहे . सदर मोबाईल ॲपचे लोकार्पण करताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित दादा हे उपस्थित होते .

सदरचे इको बाप्पा हे मोबाईल ॲप विनामुल्य प्ले स्टोअर वरुन डाऊनलोड करता येणार आहेत , सदर ॲप्सचे लोकार्पण हे सह्याद्री अतिथी गृहावर राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले .

सदर ॲप्सचे मुख्य उद्दिष्ट्ये : सदर ॲप्सचे मुख्य उद्देश म्हणजे पर्यावरण पुरक गणेश मुर्तींची मागणी वाढावी , तसेच प्रदुषण कमी व्हावेत , याकरीता पर्यावरण विभागांकडून सदर ॲप्सचे लोकार्पण करण्यात आले आहेत .सदर ॲप्सच्या माध्यमातुन पर्यावरण पुरक मुर्ती तयार करण्यात येणाऱ्या कारखानदारांची ठिकाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत , यामुळे नागरिकांना सदर ॲप्सच्या माध्यमातुन मुर्ती खरेदी करण्यास मदत होणार आहे .

सदर ॲप्सच्या माध्यमातुन गणेशाची मुर्ती खरेदी करण्यासाठी मुर्तीची किंमत , सजावट , कृत्रिम तलावांची माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत .यामुळे पर्यावरण प्रदुषण होण्यास सहाय्यभुत ठरणार आहे .

सदर पर्यावरण पुरक इको बाप्पा हे ॲप्स लाँच करताना एक रिल्स तयार करण्यात आली असून यांमध्ये रेडिओ जिंगल्स व्हिडिओज तयार करण्यात आलेला आहे , यांमध्ये लहान बालक पर्यावरण पुरक उत्सव साजरा करण्याचा संदेश देत आहे .

सदर कार्यक्रमासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर , तसेच राज्य प्रदुषण मंडळाचे अध्यक्ष सिद्देश कदम , सदर विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे तसेच महानगरपालिका आयुक्त  आदी मान्यवर सदर कार्यक्रमासाठी उपस्थित होते . सदरच कार्यक्रम हा दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी सह्याद्री अतिथी गृहावर संपन्न झाला आहे .

Leave a Comment