दीर्घकालीन सुट्या उपभोगणाऱ्यांना अर्जित रजेचा लाभ ; मा.आ.सुधाकर अडबाले यांच्या प्रयत्नांस यश !

Spread the love

संगिता पवार प्रतिनिधी [ Earned leave benefits for those enjoying long-term leave ] : दीर्घकालीन सुट्या उपभोगणाऱ्या राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना अर्जित रजेचा लाभ मिळत नाही . परंतु मा.आ.सुधाकर अडबाले यांच्या प्रयत्नांमुळे कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त झालेला आहे .

अर्जित रजेचे रोखीकरण हे फक्त दीर्घकालीन सुट्टीचा लाभ न घेणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना मिळत होता . परंतु आदिवासी विकास विभाग मार्फत दि.12.11.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयांमुळे दीर्घ कालीन सुट्याचा उपभोग घेणाऱ्यांना देखिल अर्जित रजेचा लाभ मिळणार आहे .

सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत , अशांना अर्जित रजेचे रोखीकरण देण्यात यावेत . यामुळे शासकीय आश्रमशाळेत कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी जे दीर्घ सुट्ट्यांचा लाभ घेत आहेत .

निवृत्तीसाठी  अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) संकलित पुस्तिका तसेच महाराष्ट्र नागरी निवृत्तीवेतन नियम 1982 पुस्तिका.. फक्त 100/- रुपये मध्ये सदर पुस्तिका PDF स्वरुपात WhatsApp वर लगेच पाठवली जाईल . लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

अशांना देखिल अर्जित रजेचा लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . याकरीता मा.आमदार सुधाकर अडबाले यांनी वेळोवेळी सचिव ते मंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला आहे . तसेच मा.मंत्र्यांसोबतच्या बैठकीत यावर सकारात्मक चर्चा करुन सदर अर्जित रजेचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे .

यामुळे दीर्घ सुट्टीचा उपभोग घेणाऱ्यांच्या संचित अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय करण्यात आले आहे . यांमध्ये दि.31.08.2023 अखेर निवृत्त होणाऱ्या आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे .

Leave a Comment