संगिता पवार प्रतिनिधी [ Earned leave benefits for those enjoying long-term leave ] : दीर्घकालीन सुट्या उपभोगणाऱ्या राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना अर्जित रजेचा लाभ मिळत नाही . परंतु मा.आ.सुधाकर अडबाले यांच्या प्रयत्नांमुळे कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त झालेला आहे .
अर्जित रजेचे रोखीकरण हे फक्त दीर्घकालीन सुट्टीचा लाभ न घेणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना मिळत होता . परंतु आदिवासी विकास विभाग मार्फत दि.12.11.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयांमुळे दीर्घ कालीन सुट्याचा उपभोग घेणाऱ्यांना देखिल अर्जित रजेचा लाभ मिळणार आहे .
सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत , अशांना अर्जित रजेचे रोखीकरण देण्यात यावेत . यामुळे शासकीय आश्रमशाळेत कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी जे दीर्घ सुट्ट्यांचा लाभ घेत आहेत .
निवृत्तीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) संकलित पुस्तिका तसेच महाराष्ट्र नागरी निवृत्तीवेतन नियम 1982 पुस्तिका.. फक्त 100/- रुपये मध्ये सदर पुस्तिका PDF स्वरुपात WhatsApp वर लगेच पाठवली जाईल . लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
अशांना देखिल अर्जित रजेचा लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . याकरीता मा.आमदार सुधाकर अडबाले यांनी वेळोवेळी सचिव ते मंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला आहे . तसेच मा.मंत्र्यांसोबतच्या बैठकीत यावर सकारात्मक चर्चा करुन सदर अर्जित रजेचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे .
यामुळे दीर्घ सुट्टीचा उपभोग घेणाऱ्यांच्या संचित अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय करण्यात आले आहे . यांमध्ये दि.31.08.2023 अखेर निवृत्त होणाऱ्या आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे .
- नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .
- राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !