@marathiprasar खुशी प्रवार प्रतिनिधी : आपण सोशल मिडीयामध्ये डॉली चायवालाचे हटके चहा विकण्याचे व्हिडीओ पाहत असतो , डॉली चायवाला नागपुरच्या रस्तावर टपरीवर चहा विकतो , त्याच्या चहा विकण्याच्या हटके अंदाजे , त्याची स्टाईल , त्याचे राहणीमान यामुळे डॉली सोशल मिडीयांमध्ये अधिकच लोकप्रिय झाला आहे .
डॉली चायवालाचे खरे नाव सचिन पाटील असे आहे , डॉलीच्या हटके अंदाजांमध्ये चहा बनविण्याच्या कौशल्याला प्रभावित होवून , जगातील अब्जाधीन असणारे बिल गेट्स यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर डॉली चहा बनवतानाचा व्हिडिओ शेअर केल्यापासून डॉली हा आता जागतिक दर्जाचा सेलिब्रिटी बनला आहे .यामुळे डॉली चायवाल्याचे विदेशातील फॅनच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे .
डॉली चायवाला एका दिवसांमध्ये किती पैसे कमवतो असा प्रश्न आपणांस सर्वांनाच पडला असेल , तर डॉली एका दिवसांमध्ये डॉली हा 300 ते 500 कप चहा विकतो , तर एका कपचे पैसे 7 ते 10 रुपये ऐवढे घेतो , कटींग 7 रुपये तर फुल 10 रुपये असे एका दिवसांमध्ये डॉली चहापासून एका दिवसांत 3000/- रुपेय ते 4500/- रुपये कमवतो . याशिवाय डॉलीचे स्वत : चे युट्युब चॅनेल आहे , ज्यातुन डॉली दिवसाला 1000/- ते 3000/- रुपये कमाई होते . सध्या डॉली सोशल मिडीया अधिकच चर्चेत आल्याने , त्याची सोशल मिडीया वरुची कमाई अधिक होत आहे .
एका रिपोर्टनुसार डॉलीची एकुण संपत्ती ही 10 लाख रुपये ऐवढी असल्याचे नमुद आहेत . चहाशिवाय डॉली आपल्या टपरीवर सिगारेट विकतो , त्यातुन देखिल डॉलीची कमाई होते , डॉली लहान पणापासूनच चहा विकतो . डॉलीचे शिक्षण पाहिले असता डॉली फक्त 10 वी पास आहे , त्यानंतर डॉलीने शिक्षण सोडून दिले . परंतु डॉलीने आपल्या अलग / हटके अंदाजातील चहा विकण्याच्या कौशल्यामुळे सोशल मिडीयावर अधिक लोकप्रिय झाला आहे . आता तर नागपुर ला गेल्यानंतर अनेक जन स्पेशन डॉलीचे चहा पिण्यासाठी भेट देत असतात .
डॉलीला भविष्यात कोणत्या सेलिब्रिटीला चहा द्यायला आवडेल , असे विचारले असता , डॉलीने सांगितले कि भारताचे विद्यमान पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांना चहा द्यायला आवडेल असे डॉलीने सांगितले .