महाराष्ट्र पोलिस भरती 2024 : शारीरिक चाचणी मध्ये मध्ये कोणकोणते प्रकार व किती गुणाला आहेत ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : सध्या महाराष्ट्र राज्याच्या गृह विभाग अंतर्गत पोलिस शिपाई पदांच्या 17000+ जागेसाठी महाभरती प्रक्रिया निघाली आहे , सदर पोलिस शिपाई पदांकरीता शारीरिक चाचणीमध्ये कोणकोणते प्रकार प्रकार असतात व किती गुणाला आहेत , या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

यांमध्ये पोलिस शिपाई , कारागृह शिपाई , पोलिस बॅन्डसमन पदांकरीता एकुण 50 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहेत . यांमध्ये पुरुष उमेदवारांकरीता असणारे शारीरीक प्रकार व गुण यांबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे .

पुरुष उमेदवारांकरीता /  पुरुष ( तृतीय पंथी ) उमेदवारांकरीता :

अ.क्रशारीरिक प्रकारगुण
01.1600 मीटर धावणे20
02.100 मीटर धावणे15
03.गोळाफेक15
 एकुण गुण50

महिला उमेदवार / महिला तृतीय पंथी उमेदवारांकरीता :

अ.क्रशारीरिक प्रकारगुण
01.800 मीटर धावणे20
02.100 मीटर धावणे15
03.गोळाफेक15
 एकुण गुण50

पोलिस शिपाई चालक पुरुष उमेदवारांकरीता  :

अ.क्रशारीरिक प्रकारगुण
01.1600 मीटर30
02.गोळाफेक20
 एकुण गुण50

पोलिस शिपाई चालक महिला उमेदवारांकरीता :

अ.क्रशारीरिक प्रकारगुण
01.800 मीटर30
02.गोळाफेक20
 एकुण गुण50

शारीरिक चाचणींमध्ये उत्तीर्ण उमेदवारांकरीता पोलिस शिपाई चालक पदांकरीता कौशल्य चाचणी 50 गुणांची घेण्यात येईल यांमध्ये हलेक मोटार वाहन चालविण्याची चाचणी 25 गुण तर जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी करीता 25 गुण असे 50 गुणांची कौशल्य चाचणी घेण्यात येईल .

सशस्त्र पोलिस शिपाई ( पुरुष उमेदवारांकरीता ) :

अ.क्रशारीरिक प्रकारगुण
01.5 कि.मी धावणे50
02.100 मीटर धावणे25
03.गोळाफेक25
 एकुण गुण100

रिक्त पदांच्या 1:10 प्रमाणात शारीरिक चाचणीमधील पात्र उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल . यांमध्ये अंगगणित , सामान्य ज्ञान व चालु घडामोडी , बुद्धी मत्ता चाचणी , मराठी व्याकरण प्रत्येकी 25 गुणांसाठी असे एकुण 100 गुणांची परीक्षा घेण्यात येईल .

Leave a Comment