@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Devendra Fadnavis rajinama update ] : देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणाला एक वेगळेच वळण लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत . लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदावरुन मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे .
लोकसभा निवडणुका 2024 च्या निकालानंतर राज्यातील भारतीय जनता पक्षाची धाकधुक प्रचंड वाढली आहे . कारण राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला केवळ 09 जागेवर यश मिळाले आहेत , तर राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्वाधिक 13 जागेवर विजय मिळाले आहेत , यामुळे राज्यांमध्ये येत्या विधानसभेच्या निकालावर निश्चित परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत .
राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची झालेली प्रचंड हार ची जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत : वर घेतली आहे . तर राज्यांमध्ये भाजपाची हार झाल्याने , नैतिक जबाबदारी म्हणून पदाचा राजीनामा घेण्यासाठी मुख्यमंत्रीकडे मागणी केली आहे . यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही .
देवेंद्र फडणीस यांचे म्हणणे आहे कि , राज्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण देवूनही , त्याबाबत राज्यांमध्ये अपप्रचार होताना दिसून येत आहे , तसेच संविधान बदलणे बाबत देखिल अपप्रचार होताना दिसून येत असल्याने याबाबत पक्षस्तरावर एक सविस्तर बैठक घेण्याचे आयोजन करण्यात येईल , असे सांगण्यात आले आहेत .
तर सध्याच्या पदातुन मुक्त होवून विधानसभेच्या निवडणूकासाठी पुर्ण वेळ काम करण्याची संधी मिळावी याकरीता अनुमती द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे . सध्याची लोकसभेची राज्याची स्थिती पाहता , विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला नुकसान होण्याची शक्यता असल्याने , देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री पदावरुन दुर राहून राज्यात पक्षाचे बळ वाढविण्याचे काम करु इच्छित असल्याचे सांगण्यात आले आहेत .