बीड लोकसभेचा अटी-तटीचा निकाल ; बीड लोकसभेच्या रिंगणात उभारलेल्या सर्व उमेदवारांचे निकाल पाहा सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Beed Loksabha Result ] : बीड लोकसभेचा निकालानंतर पंकजा मुंडेना मोठा धक्का बसला आहे . विधानसभा निवडणुकीच्या पराजयानंतर आता पुन्हा एकदा लोकसभेत पराजय पत्कारावे लागल्याने , आता पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे .

पंकजा मुंडे व बजरंग सोनवणे यांच्या मध्ये अटी-तटीचा सामाना झाला , यांमध्ये अवघ्या शेवटच्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी 6,485 मताने लिड घेतल्याने पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे . बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते , तर पंकजा मुंडे ह्या भाजपाकडून रिंगणात होते .

पंकजा मुंडे यांच्या पराजयाची कारणे : राज्यांमध्ये मराठा आरक्षणांचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला , यांमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणांच्या बाजुने बजरंग सोनवणे यांनी भुमिका घेतल्याने , बिड मधील मराठा समाजातील जनतेची बजरंग सोनवणे यांना मोठी मदत झाली .शिवाय मराठा आरक्षणाचे उपोषण कर्ते मनोज – जरांगे पाटील यांनी देखिल बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दर्शविला होता .

यामुळेच बजरंग सोनवणे यांचे पारडे अधिक जड झाले . बीड लोकसभा 2024 चा निकाल पाहीला असता , बजरंग सोनवणे यांना एकुण 6,83,950 इतकी मत मिळाली , तर पंकजा मुंडे यांना एकुण 6,77,397 इतकी मते मिळाले म्हणजे केवळ 6,485 मतानी बजरंग सोनवणे यांचा विजय झाला आहे .

बीड लोकसभाच्या रिंगणात उतरलेल्या कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

उमेदवाराचे नावपक्षाचे नावकिती मत मिळाले
बजरंग सोनवणेराष्ट्रवादी काँग्रेस ( श.पवार)6,83,950
पंकजा मुंडेभाजपा6,77,397
अशोक थोरातबहुजर महा पार्टी54,850
अशोक हिंगेवंचित बहुजन आघाडी50,868
शेख तोसिफ अब्दुल सत्तारअपक्ष9,473
सिद्धार्थ ताकणकरबहुजन समाज पार्टी5,129
समशेर खानअपक्ष4,703
जावेद सिकंदर मोमीनअपक्ष2,665
नाझिम खान जब्बर खानअपक्ष2,586
गोकुळ सावसेअपक्ष2,577
गफरखान जब्बरखान पठाणअपक्ष2,567
दत्ता सुदाम गायकवाडअपक्ष2,130
सतिश कापसेअपक्ष2,094
करुणा मुंडेस्वराज्य शक्ती सेना1600
श्रीराम खलगेअपक्ष1512
गणेश खरांडेअपक्ष1508
शितल धोंद्रेअपक्ष1303
शेख याशेदअपक्ष1258
जावेद सलिमअपक्ष978
प्रकाश सोलंकेअपक्ष886
चंद्रकांत हजारेअपक्ष807
सलाउदीन खान पठाणअपक्ष727
कसपते गणेशअपक्ष719
मुबीन झुबेरी झाकीरअपक्ष677
वाशिम शेख सलिम शेखअपक्ष580
शेख इजाज शेख उमरअपक्ष550
शेशेराव चोखोबा वीरअपक्ष537
ताटे महेंद्र अशोकअपक्ष533

Leave a Comment