@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Dearness allowance for January 2025 finally fixed; DA will increase by this percentage ] : माहे जानेवारी 2025 चा महागाई भत्ता अखेर निश्चित झाला आहे , यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये माहे जानेवारी 2025 पासुन तीन टक्यांची वाढ होणार आहे .
प्राप्त माहितीनुसार , ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक नुसार डी.ए मधील वाढ निश्चित झालेली आहे . डी.ए वाढ ही AICPI च्या निर्देशांकानुसार निश्चित करण्यात येते . माहे जुलैचा डी.ए निश्चित करताना जानेवारी ते जुन पर्यंतच्या AICPI चा विचार केला जातो . तर जानेवारी चा डी.ए निश्चित करताना माहे जुलै ते डिसेंबर पर्यंतच्या AICPI निर्देशांकाचा विचार केला जातो .
नुकतेच केंद्रीय कामगार मंत्रालयाकडुन माहे डिसेंबर महिन्यांचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आले आहेत . यांमध्ये माहे डिसेंबर 2024 चा निर्देशांक हा 143.7 इतका आहे . माहे जुलै ते माहे डिसेंबर 2024 पर्यंतच्या निर्देशांकाचा विचार करता सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 3 टक्क्यांची वाढ निश्चित झालेली आहे .
डी.ए वाढीचा प्रस्ताव : केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून महागाई भत्ता वाढीचा प्रस्ताव तयार केला असून , मंत्रीमंडळाच्या मंजूरीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती प्रसार माध्यमांनुसार समोर येत आहे . डी.ए वाढ व फरकाची रक्कम मिळणार : केंद्रीय सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांना पुढील महिन्यात 03 टक्के डी.ए वाढ म्हणजेच एकुण 56 टक्के दराने महागाई भत्ताचा लाभ माहे जानेवारी 2025 पासुन फरकास मिळणार आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !