यंदाही राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार 1 रुपयांमध्ये पीक विमा संरक्षण ; या दिनांकापर्यंत करता येणार आवेदन !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : शेतकऱ्यांना पिक विमा संरक्षण मिळण्यासाठी केवळ एक रुपयांचा प्रिमियम भरावा लागणार आहे , यामुळे यंदाच्या वर्षी देखिल शेतकऱ्यांना फक्त एक रुपयांच्या प्रिमियम मध्ये पिकांचा विमा संरक्षण काढता येणार आहे .

केंद्र शासन पुरस्कृत असणारी पीएम विमा योजना अंतर्गत मागील वर्षांपासुन पिकांसाठी प्रथमच ही सर्वसामावेशक पीक विमा योजना राबविण्यास मंजूरी देण्यात आलेली होती , या विमा योजनांमुळे शेतकऱ्यांना पिकांवरील विविध रोग , नैसर्गिक आपत्ती , कीड व रोगासारक्ष्या अकल्पित प्रतिकूल स्थितीमुळे होणारे पिकांचे नुकसान झाले असल्यास सदर विमा अंतर्गत संरक्षण मिळेल .

यंदाच्या वर्षी खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरविण्याकरीता दिनांक 15 जुलै 2024 पर्यंत आवेदन सादर करण्याचे आव्हान कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आले आहेत . पिकांचे नुकसान झाल्यास , शेतकऱ्यांना सदर विमा योजना अंतर्गत संरक्षण प्राप्त होते . नेमके कोणत्या बाबींकरीता नुकसान भरपाई मिळेल ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..

यांमध्ये वीज कोसळून तसेच गारपीट , तसेच पिकांच्या हंगाती प्रतिकुल स्थितीमुळे होणारे नुकसान , तसेच पिक पेरणीमधून काढणी दरम्यान कालावधीत लागलेली आग , वादळ तसेच चक्रिवादळ , पुर स्थितीमुळे जयमय होणे , त्याचबरोबर नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे काढणी पश्चात होणारे नुकसान , तर स्थानिक आपत्तीमुळे होणारे नुकसान इ. बाबींमुळे झालेल्या नुकसानींपासुन संरक्षण दिले जाते .

अर्ज कसा करता येईल ? : सदर विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ घेण्याकरीता केंद्र सरकारमार्फत एक नविन विमा पोर्टलची सुरुवात करण्यात आलेली असून ,त्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करुन केवळ एक रुपयांच्या प्रिमियम वर विमा संरक्षण प्राप्त करु शकता , अर्ज सादर करण्याकरीता pmfby.gov.in या वेबसाईटवर आवेदन सादर करु शकता ..

Leave a Comment