@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Amrutvruksha apalya dari ] : राज्यांमध्ये सन 2024-25 या कालावधीमध्ये वन महोत्सव अंतर्गत अमृतवृक्ष आपल्या दारी ही योजना राबविणेबाबत राज्य शासनांच्या महसुल व वन विभाग मार्फत दि. 18 जुन 2024 रोजी GR निर्गमित केला गेला आहे .
यंदाच्या उन्हाळ्यांमध्ये उन्हांचे प्रमाणे सर्वाधिक वाढले होते , तर विदर्भ व मराठवाड्यांमध्ये उन्हाचा पारा 40 च्या वरतीच होता , यामुळे वृक्षतोड थांबवून वातावरण संतुलित करण्याच्या उद्देशाने तसेच स्वातंत्र्याच्या 75 वर्षे पुर्ण झाल्याच्या पार्श्वभुमीवर केंद्र शासनांच्या एक पेड माँ के नाम ही संकल्पना राज्यांमध्ये राबविण्यास सदर निर्णय मान्यता दिली गेली आहे .
Plant4mother : राज्यांमध्ये केंद्राची एक पेड माँ के नाम – Plant4mother या योजनांची पुर्तता होईल तसेच राज्यांमध्ये या पुर्वीपासुन सुरु असलेले वृक्ष लागवडीचे धोरण पुढे अखंडतीपणे सुरु रहावे , याकरीता शासकीय व खाजगी माली असणाऱ्या पडीक क्षेत्र व गायरान क्षेत्रांवर त्याचबरोबर शेत बांधावर तर रेल्वे दुतर्फा , रस्ता दुतर्फा क्षेत्रात तर पडीक क्षेत्र आणि गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेता यावा याकरीता ..
राज्यातील सर्वसामान्य शेतकरी व वृक्षप्रेमी यांना माफक दरांमध्ये रोपे उपलब्ध व्हावेत यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षांमध्ये वन महोत्सवाच्या कालावधीत अमृतवृक्ष आपल्या दारी योजना राबविण्याच्या उद्देशाने त्याचबरोबर त्यानंतरच्या सर्वसाधारण कालावधीत पुढीलप्रमाणे नमुद करण्यात आलेल्या सवलतीच्या दराप्रमाणे रोपांचा पुरवठा करण्यास मान्यता देण्यात येत आहेत .

वन महोत्सवाच्या कालावधी हा दिनांक 15 जुन ते दिनांक 30 सप्टेंबर असा असणार आहे , तर वन महोत्सवाचे प्रयोजन व महत्व याबाबत प्रभावीपणे सर्वदुर पोहोचणाऱ्या माध्यमातुन जिल्हा माहिती अधिकारी / विभागाचे / विभागाची यांच्या मार्फत योग्य प्रसिद्धी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर निर्णयांमध्ये नमुद केल्यानुसार , दिनांक 15 जुन ते दिनांक 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये , मोफत रेापे वाटप , सवलतीच्या दरांमध्ये वाटप करणे , तसेच अमृत वृक्ष आपल्या दारी या उपक्रम अंतर्गत रोपे वाटप करण्याचे निर्देश आहेत .
अधिक माहितीसाठी Click here (शासन निर्णय)
-
पुढील 03 महिन्यात सोन्याचे भाव गगणाला भिडणार ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Gold prices will skyrocket in the next 3 months ] : पुढील 03 महिन्यांमध्ये सोन्याचे भाव हे गगणाल भिडणार असे अर्थतज्ञांचे मत आहे . याबाबतचे नमके कारण काय आहे , याबाबतची सविस्तर आकडेवारी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . सध्याचे सोन्याचे भाव : सध्याचे 24 कॅरेट सोन्याचे भाव हे 101,700/-…
-
Rain Update : पुढील 48 तासात राज्यातील या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Red alert issued for rain in these districts of the state in the next 48 hours; Know the detailed weather forecast. ] : राज्यातील पुढील 48 तासात काही जिल्ह्यांना हवामान खात्यांकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे ; या संदर्भातील सविस्तर अंदाज पुढीलप्रमाणे पाहुयात . हवामान खात्याने दिलेल्या…
-
राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.13 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 02 important Government Decisions (GR) were issued on 13th June regarding State Employees/Officers. ] : राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दिनांक 13 जुन 2025 रोजी 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.ग्रामपंचायत कर्मचारी : सन 2025-26 या आर्थिक वर्षांमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व भविष्य निर्वाह…