@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ contractual employee service renew GR ] : आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रम शाळेमधील क्रीडा , कला व संगणक शिक्षकांच्या कंत्राटी पद्धतीने निवड करणे संदर्भात दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण जीआर निर्गमित केला गेला आहे .
आदिवासी विकास विभागाच्या दिनांक 16 नोव्हेंबर 2022 रोजीच्या निर्णयानुसार , प्रत्येक शासकीय आश्रमशाळेमध्ये 01 कला , 01 संगणक शिक्षक , 01 क्रीडा शिक्षक असे एकूण 1497 पदे मंजूर करण्यात आली असून , त्यांच्या सेवा ह्या बाह्य स्त्रोताद्वारे घेण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे .
आदिवासी विकास विभाग अंतर्गत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षांमध्ये शासकीय आश्रम शाळेमध्ये एकूण 252 कलाशिक्षक , 340 क्रीडा शिक्षक तर 244 संगणक शिक्षक असे एकूण 836 कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती . सदर 836 कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांमध्ये करण्यास मान्यता देण्यात येत आहे .
याकरिता सदर कंत्राटी शिक्षकांची इच्छुकता मागवण्यात येणार असून सदर शिक्षकांची कामकाज समाधान कारक आहे किंवा नाही ते तपासुन संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून सदर शिक्षकांचे कामकाज समाधानकारक होते अशा शिक्षकांना सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता मंजुरी देण्यात येत आहे .
सदर शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर सदर कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल , असे नमूद करण्यात आली आहे . तसेच सदर शासन निर्णय मध्ये नमूद करण्यात आली आहे की , सदर क्रीडा शिक्षक , कलाशिक्षक व संगणक शिक्षक या पदांचे मानधन आश्रमशाळा समूह या योजनेअंतर्गत मंजूर तरतुदी मधून भागवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .


- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !