बदलीकरीता विशेष संवर्ग सेवा कालावधीच्या अट बाबत परिपत्रक दि.02.04.2025

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Circular regarding Special Cadre Service Period Conditions for Transfer dated 02.04.2025 ] : बदली करीता विशेष संवर्ग सेवा कालावधीच्या अट बाबत ग्रामविकास विभाग मार्फत दिनांक 02 एप्रिल 2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रक हे ग्राम विकास विभागाच्या दिनांक 21 फेब्रुवारी 2019 व दिनांक 31 नोंव्हेंबर 2022 रोजीच्या परिपत्रकाच्या संदर्भाधिन परिपत्रकानुसार निर्गमित करण्यात आले आहेत .

यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , ग्राम विकास विभागाच्या दिनांक 18 जुन 2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग – 01 व विशेष संवर्ग भाग – 02 अंतर्गत बदली करीता विनंती अर्ज सादर करण्यासाठी वरील नमुद केलेल्या संदर्भाधिन परिपत्रक मधील दिनांक 21 फेब्रुवारी 2019 रोजीच्या परिपत्रकामधील तरतुदी कायम असतील अशी बाब नमुद करण्यात आलेली आहे .

दिनांक 21.02.2019 रोजीच्या निर्णयांमध्ये नमुद केल्यानुसार , ज्या जिल्हा परिषदांनी विशेष संवर्ग 01 व विशेष संवर्ग 02 मध्ये येणाऱ्या शिक्षकांवर त्यांची 10 वर्षांची सेवा झाली नाही व विशेष संवर्ग 01 व विशेष संवर्ग 02 मध्ये आवेदन भरलेले आहेत , म्हणून त्यांच्या विरुद्ध कारवाई केलेली आहे .

हे पण वाचा : राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडीयाच्या वापरावर कात्री ; नविन नियमावली !

अशा शिक्षकांच्या विरुद्ध कारवाई रद्द करुन व त्यांची झालेली बदली रद्द केली असल्यास , त्यांना पुर्ववत त्याच शाळेवर पदस्थापना देण्यात आलेली आहे .

Leave a Comment