शैक्षणिक वर्ष 2025-26 पासुन 4 वर्षीय बी.ए/बी.एस्सी बी.एड बंद करुन नविन 4 वर्षीय ITEP अभ्यासक्रम सुरु करणेबाबत परीपत्रक ..

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Circular regarding discontinuing the 4-year B.A./B.Sc. B.Ed and starting a new 4-year ITEP course from the academic year 2025-26. ] : राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषद यांनी त्यांची अधिसूचना दिनांक 25 जानेवारी 2024 तसेच जाहीर केलेल्या सुचना दिनांक 02 फेब्रुवारी 2024 नुसार 4 वर्षीय बी.ए/ बी.एस्सी बी.एड हा अभ्यासक्रम बंद करुन प्रस्तुत अभ्यासक्रम 4 वर्षीय ..

एकात्मिक शिक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रम या अभ्यासक्रमांमध्ये परिवर्तीत करण्याचे विहीत धोरण निश्चित करण्यात आले आहेत . त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय यांच्या दिनांक 04.03.2025 रोजीच्या पत्रानुसार शैक्षणिक वर्ष सन 2025-26 पासुन चार वर्षांच्या बी.ए / बी.एस्सी . बी.एड ( एकात्मिक ) ..

अभ्यासक्रमासाठी सामाईक प्रवेश परीक्षा व केंद्रीभुत प्रवेश प्रक्रिया राबविणेबाबत येवू नयेत असे कळविण्यात आले आहेत . तसेच शैक्षणिक वर्ष सन 2025-26 मध्ये चार वर्षांच्या बी.ए / बी.एस्सी बी.एड ( एकात्मिक ) सीईटी 2025 अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे आयोजित चार वर्षीय एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम ..

अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा एनसीईटी 2025 साठी ऑनलाईन अर्ज भरण्याचा सल्ला देण्यात येत आहे . तरी उमेदवारांनी अर्ज भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

शैक्षणिक वर्ष सन 2025-26 या वर्षात चार वर्षांच्या बी.ए / बी.एस्सी बी.एड अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षा करतांना भरलेले शुल्क परत करण्यात येईल , त्याबाबत स्वतंत्र सुचना लवकरच संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल असे नमुद करण्यात आले आहेत .

Leave a Comment