@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ These important announcements were made for farmers in the budget. ] : अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्वपुर्ण घोषणा करण्यात आलेल्या आहेत . या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यांतील 7,201 गावांमध्ये राबविण्यात येत असून , या प्रकल्पासाठी सन 2025-26 मध्ये 351 कोटी 42 लाख रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे .
मोफत वीज योजना : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अंतर्गत 7.5 अश्वशक्ती पर्यंतच्या 45 लक्ष कृषी पंपांना मोफत वीज पुरविण्यात येत आहे .
एक तालुका एक बाजार : ज्या तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नाही , तेथे किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचे ठरविण्यात आले आहेत . त्यासाठी एक तालुका एक बाजार समिती योजना राबविण्यात येणार आहे .
हे पण वाचा : रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
बांबु लागवड : राज्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे , बांबूला बाजारपेठ उपलब्ध करुन देणे तसेच बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात 4,300/- कोटी रुपये किंमतीचा बांबू लागवड प्रकल्प राबविण्यात येणार आहे .
कृषी व्यवयाय व परिवर्तन -स्मार्ट प्रकल्प योजना : लहान , सीमांत शेतकरी व कृषी नव उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी 2100 कोटी रुपये किंमतीचा मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन – स्मार्ट प्रकल्प राबवण्यिात येत आहे .
- शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याकरीता माहिती उपलब्ध करुन देण्याचा परिपत्रक व नमुना !
- भाजपाच्या प्रचंड विरोधानंतरही मुस्लिमांना अखेर 4% आरक्षण ; विधानसभेत मंजुरी – जाणुन घ्या सविस्तर माहिती !
- दिनांक 25 मार्च पर्यंतचा हवामान अंदाज : राज्यात या भागात पडणार अवकाळी पाऊस !
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025