मुख्यमंत्री यांचा 100 दिवसांच्या कृति कार्यक्रमांसाठी सात कलमी आराखडा ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Chief Minister’s seven-point plan for 100 days of work programs ] : मुख्यमंत्री यांचा 100 दिवसांचा कृती कार्यक्रमांसाठी सात कलमी आराखडा आखण्यात आलेला आहे , ज्यांमध्ये प्रशासन / विभाग प्रमुखास कार्य करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

अधिकृत्त संकेतस्थळ : सर्व कार्यालयांना आपल्या विभ्ज्ञागाचे संकेतस्थळ अद्ययावत ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . सदर संकेतस्थळावर आवश्यक बाबींचा तपशिल , सुरक्षेतेच्या अद्ययावत ठेवणे आवश्यक असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .

स्वच्छता : सर्व कार्यालये स्वच्छ व निटनिटके तसेच कार्यालय आवार स्वच्छ ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून , कार्यालयातील अभिलेखे अद्ययावत ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

जनता तक्रारी : जनतेच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी  आपले सरकारवर आलेल्या तक्रारीची निवारण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हा , तालुका व विभाग स्तरावर अधिकारी / कर्मचाऱ्यांची प्रभावी नेमणूक करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

कार्यालयातील आवश्यक सोयी / सुविधा : कार्यालयांमध्ये आवश्यक सोयी / सुविधा असावेत , जसे कि स्वच्छ प्रसाधनगृहे तसेच सुसज्ज प्रतिक्षालय असावेत , त्याचबरोबर कार्यालय परिसरांचे सौंदर्यीकरण करण्यात यावेत ,अशी बाब नमुद करण्यात आलेली आहे .

याशिवाय गुंतवणुकीवर प्रोत्साहन , सुकर जीवनमान करीता आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

Leave a Comment