@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ employee retirement age nirnay ] : सेवानिवृत्ती वय बाबत आत्ताची मोठी महत्वपुर्ण बातमी समोर येत आहे , ती म्हणजे मध्य प्रदेश राज्य सरकारने कर्मचारी निवृत्तीचे वय वाढविण्यात आलेले आहेत .
मध्य प्रदेश राज्याचे मा.मुख्यमंत्री मोहन यादव यांनी जाहीर केल्यानुसार आयुष विभाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या डॉक्टर पदांच्या निवृत्तीचे वय हे 62 वर्षांवरुन 65 वर्षे इतके करण्यात आले आहेत . यामुळे सदर डॉक्टरांसाठी सदर निवृत्ती वय वाढीची मोठी भेट असणार आहे .
सदरची घोषणा हि भोपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या आयुर्वेद महापर्व 2025 या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सदर निर्णयाची घोषणा केली आहे . सदर निवृत्तीचे वय वाढीबाबत त्यांनी कारणे व उद्देश देखिल स्पष्ट केली आहेत .
यामागील प्रमुख उद्देश म्हणजे डॉक्टरांच्या अनुभवाचा अपव्यय होणार नाही , व त्यांच्या ज्ञानाचा योग्य उपयोग होईल , असे नमुद करण्यात आले आहेत . शिवाय डॉक्टर पदाच्या शिक्षणासाठी लागणार कालावधी देखिल लक्षात घेवून सदर निर्णय घेण्यात आलेला आहे .
याशिवाय मुख्यमंत्री महोदयांनी आयुष क्षेत्रातील इतर महत्वपुर्ण आवश्यक बाबीसाठी देखिल विशेष तरतुद करण्याची घोषणा या दरम्यान करण्यात आली आहे .
- राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.13 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- महाराष्ट्र पेन्शनर्स : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी अपडेट ; पेन्शनर्स असोसिएशन , पुणे मार्फत प्रसिद्धपत्रक निर्गमित !
- दि.10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !
- निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने घेणे व जुनी पेन्शन बाबत 02 स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित दि.10.06.2025
- राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 10 जुन रोजी घेण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) !