केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी ; DA दर 57% पर्यंत वाढणार ! नविन आकडेवारी आली समोर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ central employee good news about mahagai Bhatta vadh ] : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे . ती म्हणजे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाची माहे नोव्हेंबर 2024 पर्यंतची आकडेवारी समोर आली असून , सदर आकडेवारीनुसार कर्मचाऱ्यांचा डी.ए दर हा 56 पेक्षा अधिक होणार आहे .

अ.क्रमहिनाCPI INDEX
01.जुलै 2024142.7
02.ऑगस्ट 2024142.6
03.सप्टेंबर 2024143.3
04.ऑक्टोंबर 2024144.5
05.नोव्हेंबर 2024144.5

वरील आकडेवारीनुसार माहे जुलै 2024 पासुन आकडेवारी मध्ये वाढ झालेली आहे . तर कर्मचाऱ्यांचा माहे जानेवारी महिन्यातील डी.ए दर हे जुलै ते डिसेंबर पर्यंतच्या आकडेवारीनुसार निश्चित करण्यात येत असतो .

माहे ऑगस्ट नंतर माहे सप्टेंबर पर्यंत निर्देशांकामध्ये 4.22 अंकांची वाढ झालेली आहे , तर माहे ऑक्टोंबर पर्यंत नंतर निर्देशांकामध्ये 3.88 अंकांची घसरण झालेली आहे . सदर निर्देशांकांच्या आधारेच डी.ए दर निश्चित करण्यात येणार आहेत .

अद्याप माहे डिसेंबर महिन्याची आकडेवारी जाहीर होणे बाकी आहे , सदर आकडेवारी जाहीर झाल्याच्या नंतर जानेवारी महिन्यातील डी.ए दर निश्चित करण्यात येतील . सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकुण 53 टक्के डी.ए दर लागु आहेत . तर यांमध्ये आणखीण 4 टक्क्यांची वाढ होवू शकते .

Leave a Comment