केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मधील महत्त्वपूर्ण बाबी ; कोणत्या गोष्टी स्वस्त तर कोणत्या गोष्टी महाग जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Union Budget 2024 important updates ] : भारतीय जनता पार्टीने लोकसभेत तिसऱ्यांदा निवडणुक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी तिसऱ्यांदा देशाचे अर्थसंकल्प,  दिनांक 23 जुलै 2024 रोजी सादर केली आहे .  या अर्थसंकल्पातील महत्त्वपूर्ण बाबी पुढील प्रमाणे जाणून घेऊयात ..

सदर अर्थसंकल्पामध्ये काही बाबीवर सरकारकडून अधिक कर लागण्यात आले , तर सर्वसामान्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तूवर कर कमी करण्यात आले आहेत . यासह अनेक नवीन योजनाबाबत अर्थसंकल्पामध्ये घोषणा करण्यात आली आहे . महिलांकरिता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करणे , संदर्भात घोषणा करण्यात आली आहे . त्याचबरोबर तरुण वर्गांना रोजगार उपलब्ध करून दिले जाणार आहेत .

या बाबी होणार स्वस्त : अर्थसंकल्प मांडल्यानंतर सर्वसामान्यांना आवश्यक असणाऱ्या मोबाईलचे सुटे भाग , कॅन्सर वरची औषधे, तांबे ,पोलाद, लिथियम बॅटरी ,इलेक्ट्रिक वाहने ,सोलार सेट, चामड्या पासून बनवण्यात येणारी वस्तू विजेच्या तारी पीव्हीसी फ्लेक्स बॅनर  ,सोने , चांदी यावरील आयात कर मध्ये सूट अशा बाबी स्वस्त होणार आहेत .

या बाबी महागणार : अर्थसंकल्प मांडल्यानंतर देशांमध्ये प्लास्टिक उद्योगावर करांचा बोजा वाढवण्यात आला आहे . त्याचबरोबर प्लास्टिक उत्पादने यानंतर महागणार आहेत . त्याचबरोबर शेअर मार्केट मधील खरेदी विक्रीवर अधिक कर आकारण्यात आला आहे .

त्याचबरोबर प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना ची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे , तसेच कृषी क्षेत्रासाठी 1.52 कोटी रुपयांची तरतूद सदर अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे . त्याचबरोबर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावेत याकरिता शैक्षणिक कर्ज याकरिता दहा लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे .

त्याचबरोबर सदर अर्थ संकल्पामध्ये स्टॅंडर्ड डिडक्शन ची मर्यादा 50 हजार रुपयांवरून 75 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे तर तीन लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले असून , तीन लाख ते सात लाख उत्पन्न असणाऱ्यांना आता 5% टक्के आयकर भरावा लागणार आहे . तर सात ते दहा लाख रुपये पर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 10 टक्के तर दहा ते बारा लाख उत्पन्न असणाऱ्यांना 15 टक्के आयकर भरावा लागणार आहे .

तर बारा ते पंधरा लाख उत्पन्न असणाऱ्यांना यापुढे 20 टक्के इतके आयकर भरावा लागणार आहे . तर पंधरा लाखांवर उत्पन्न असणाऱ्यांना 30 टक्के आयकर भरावा लागणार आहे .

Leave a Comment