राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतन देयकाबाबत मोठी अपडेट ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Big update regarding February and March salary payment of state employees ] : राज्य कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार , डी.ए मध्ये 03 टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे .

सदर डी.ए वाढीनंतर शालार्थ वेतन प्रणालीवर डी.ए सुधारित दर टाकण्यात आलेले आहेत . यांमध्ये डी.ए फरकाचा ऑप्शन देखिल यापुर्वीच नमुद आहे , त्यावर क्लिक करुन डी.ए फरकाची रक्कम अदा करता येईल .

घरभाडे भत्ता : सातवा वेतन आयोगानुसार निर्धारित केल्यानुसार डी.ए चे दर हे 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्ता हे सुधारित होणार आहेत . परंतु सध्या शालार्थ प्रणालीवर घरभाडे भत्ताचे सुधारित दर अपडेट करण्यात आलेले नाहीत . यामुळे सदर माहे फेब्रुवारी वेतन देयकासोबत ..

सुधारीत घरभाडे भत्ता अदा करता येणार नाही . याकरीता शालार्थ प्रणालीवर सदरचे दर हे सुधारित होणे अपेक्षित आहे . त्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना वास्तव्याच्या ठिकाणानुसार 30 टक्के , 20 टक्के व 10 टक्के अशी एचआरए मध्ये वाढ सुधारित होईल .

तसेच सुधारित वेतन संरचनेत वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर असुधारित वेतन संरचनेत वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्ताच्या दरात दिनांक 01.07.2024 पासुन सुधारणा करणेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासन प्रमुखांकडून संबंधितांना देण्यात आले आहेत .

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment