राज्यांमध्ये सन 2024-25 या कालावधीमध्ये अमृतवृक्ष आपल्या दारी ह्या योजना अंतर्गत माफक दरांमध्ये रोपांची विक्री .

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Amrutvruksha apalya dari ] : राज्यांमध्ये सन 2024-25 या कालावधीमध्ये वन महोत्सव अंतर्गत अमृतवृक्ष आपल्या दारी ही योजना राबविणेबाबत राज्य शासनांच्या महसुल व वन विभाग मार्फत दि. 18 जुन 2024 रोजी  GR निर्गमित केला गेला आहे .

यंदाच्या उन्हाळ्यांमध्ये उन्हांचे प्रमाणे सर्वाधिक वाढले होते , तर विदर्भ व मराठवाड्यांमध्ये उन्हाचा पारा 40 च्या वरतीच होता , यामुळे वृक्षतोड थांबवून वातावरण संतुलित करण्याच्या उद्देशाने तसेच स्वातंत्र्याच्या 75 वर्षे पुर्ण झाल्याच्या पार्श्वभुमीवर केंद्र शासनांच्या एक पेड माँ के नाम ही संकल्पना राज्यांमध्ये राबविण्यास सदर निर्णय मान्यता दिली गेली आहे .

Plant4mother : राज्यांमध्ये केंद्राची एक पेड माँ के नाम – Plant4mother या योजनांची पुर्तता होईल तसेच राज्यांमध्ये या पुर्वीपासुन सुरु असलेले वृक्ष लागवडीचे धोरण पुढे अखंडतीपणे सुरु रहावे , याकरीता शासकीय व खाजगी माली असणाऱ्या पडीक क्षेत्र व गायरान क्षेत्रांवर त्याचबरोबर शेत बांधावर तर रेल्वे दुतर्फा , रस्ता दुतर्फा क्षेत्रात तर पडीक क्षेत्र आणि गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेता यावा याकरीता ..

राज्यातील सर्वसामान्य शेतकरी व वृक्षप्रेमी यांना माफक दरांमध्ये रोपे उपलब्ध व्हावेत यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षांमध्ये वन महोत्सवाच्या कालावधीत अमृतवृक्ष आपल्या दारी योजना राबविण्याच्या उद्देशाने त्याचबरोबर त्यानंतरच्या सर्वसाधारण कालावधीत पुढीलप्रमाणे नमुद करण्यात आलेल्या सवलतीच्या दराप्रमाणे रोपांचा पुरवठा करण्यास मान्यता देण्यात येत आहेत .

वन महोत्सवाच्या कालावधी हा दिनांक 15 जुन ते दिनांक 30 सप्टेंबर असा असणार आहे , तर वन महोत्सवाचे प्रयोजन व महत्व याबाबत प्रभावीपणे सर्वदुर पोहोचणाऱ्या माध्यमातुन जिल्हा माहिती अधिकारी / विभागाचे / विभागाची यांच्या मार्फत योग्य प्रसिद्धी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

सदर निर्णयांमध्ये नमुद केल्यानुसार , दिनांक 15 जुन ते दिनांक 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये , मोफत रेापे वाटप , सवलतीच्या दरांमध्ये वाटप करणे , तसेच अमृत वृक्ष आपल्या दारी या उपक्रम अंतर्गत रोपे वाटप करण्याचे निर्देश आहेत .

अधिक माहितीसाठी Click here (शासन निर्णय)

Leave a Comment