दहावी नंतर करा हे डिप्लोमा / कोर्स लगेच मिळेल नोकरी ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आपण जर इयत्ता दहावी नंतर लगेच नोकरी मिळवू इच्छित असाल तर आपणांस इयत्ता दहावीनंतर आपणांस कोणते डिप्लोमा / कोर्स करावे लागतील , जेणेकरुन आपणांस लगेच नोकरी मिळेल ? असे नेमके कोणकोणते डिप्लोमा / कोर्स आहेत , ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..

आयटीआ  मधील डिप्लोमा : दहावीच्या नंतर आयटीआय मधील कोर्स / डिप्लोमा केल्यास , आपणांस निश्चितच नोकरीची 100  हमी प्राप्त होईल . दहावी नंतर कोण-कोणते आयटीआय कोर्स आहेत , ते पुढीलप्रमाणे पाहुयात .

  • ॲटोमोबाईल
  • पेंटर
  • केमिकल
  • सहाय्यक सिव्हील इंजिनिअर
  • फिटर
  • इलेक्ट्रिशियन
  • ब्युटी पार्लर ( महिलांसाठी )
  • हेअर कटींग ( पुरुषांसाठी )
  • टेलरींग ( कपडे शिवणकाम )
  • कोपा
  • संगणक विज्ञान
  • कॉम्प्युटर सॉफ्टवेअर डिझाईन
  • डेअरी फार्मिंग
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • मशिनिस्ट
  • लाईनमन
  • टी.व्ही / मोबाईल रिपेअरिंग
  • टर्नर
  • वेब डिझाइनिंग
  • पाईप फिटर
  • मेकॅनिक डिझेल

 अशा प्रकारचे डिप्लोमा / कोर्सेसे केल्यास आपणांस 10 वी नंतर निश्चितच चांगल्या पगाराची  सरकारी / खाजगी नोकरी मिळेल . याकरीता आपणांस दहावी मध्ये गुणांची अट राहणार नाही . सरकारी / खाजगी आयटीआय मध्ये आपण हे कोर्सेस पुर्ण करुन नोकरी मिळवू शकता .

जर आपणांस नोकरी जरी नाही मिळाली तरी आपण वरील कोर्सेस करुन स्वत : चा व्यवसाय सुरु करु शकता . उदा . आपण टेलरींग कोर्स करुन स्वत : चा टेलरिंगचा व्यवसाय सुरु करु शकता . तसेच ब्युटी पार्लरचा कोर्स करुन पार्लरचा व्यवसाय करु शकता ..

याशिवाय आपण इयत्ता 10 वी नंतर नर्सिंग डिप्लोमा / कोर्स केल्यास आपणांस निश्चितच चांगल्या पगाराची नोकरी मिळेल तसेच वैद्यकिय क्षेत्रांमध्ये लॅब टेक्निशियन , फार्मासिस्ट असिस्टंट , रेडिओ तंत्रज्ञ इ. कोर्स केल्यानंतर आपणांस वैद्यकिय क्षेत्रांमध्ये सरकारी / खाजगी दवाखान्यांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळेल .

Leave a Comment