@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : पुढील महिन्यांमध्ये देशांमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत , त्या अनुषंगाने राज्यांमध्ये या महिन्यांतील 13 मार्च 2024 पासुन आचारसंहिता लागु होणार आहेत . तर लोकसभाच्या निवडणुकांच्या अगोदरच राज्याचे राजकिय चित्र बदलणार असे अनेकांना वाटत आहे .
कारण राज्यांमध्ये त्रिकुट पक्षांचे सत्ता स्थापन झाले आहेत . सध्याच्या राज्यातील सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) ज्यांचे आयुष्यभर भारतीय जनता पार्टीचे कधीच जमले नाही , अशा पार्टीसोबत भाजपाने सत्ता स्थापन केली आहे . यांमध्ये अजित पवारांची काही मजबुरी असल्याचे अनेकांकडून बोलले जात आहेत . यामुळे या सत्तेमधून राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) बाहेर पडण्याच्या शक्यता अधिक आहेत .
तर भारतीय जनता पार्टी व शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) एकत्र लोकसभा निवडणुका लढविणार असल्याचे निश्चित झालेले आहेत , त्याचबरोबर जागावाटपावर देखिल हे दोन पक्ष सहमत असणार आहे , यांमध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळतील . तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांमध्ये अजित पवार गट सहभाग घेणार नाही , तर यांमध्ये शरद पवार गट राष्ट्रवादी पक्ष म्हणून लोकसभेच्या निवडणुका लढवतील .
जर यांमध्ये अजित पवार गट सत्तेत राहुन लोकसभा निवडणुका लढविल्यास सर्वात कमी जागा अजित पवार गटांना मिळतील , यामुळे सत्तेतुन अजित पवार बाहेर पडण्याची देखिल शक्यता असल्याचे सांगितले जात आहे . शिंदे गटांना सर्वोच्च न्यायालयांना दिलासा दिल्याने , शिवसेना या नावावरच मा.एकनाथ शिंदे आपल्या नेतृत्वाखाली लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लढवतील .तर उद्धव ठाकरे दुसऱ्या नविन पक्षांसह – नविन चिन्हांसह निवडणुका लढतील .