राज्य पोलिस अधिकारी / कर्मचारी यांना यापुढे आपल्या खाजगी वाहनांवर पोलिस बोध चिन्ह / पोलिस असे फलक लिहिल्यास होणार कार्यवाही !

Spread the love

@marathipear संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra police department employee private moter rules ] : राज्यातील गृह विभाग अंतर्गत कार्यरत सर्व जिल्ह्यातील पोलिस अधिकारी / कर्मचारी यांच्याकडून खाजगी वाहनांवर पोलिस बोधचिन्ह त्याचबरोबर पोलिस अश्या प्रकारचे लिहणाऱ्या वाहनांवर आता आता कारवाई होणार असल्याचे नमुद करण्यात आले आहेत .

राज्य शासनांच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई ( पुर्व ) कार्यालयामार्फत श्री.विकी कुंडलिक जाधव , पत्रकार यांचा दिनांक 16 जुलै 2024 रोजीच्या ई-मेलच्या संदर्भिधीन पत्रानुसार , सदर परिपत्रक प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई मार्फत दिनांक 06 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत .

सदरच्या परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , श्री.विकी कुंडलिक जाधव , पत्रकार यांच्यामार्फत राज्यामधील सर्व जिल्हा अंतर्गत कार्यरत पोलिस अधिकारी / कर्मचारी यांना त्यांच्या स्वत : खाजगी वाहनांवर  पोलिस तसेच पोलिस बोध चिन्हे लिहणाऱ्या वाहनांवर कारवाई करणेबाबत तक्रारीचा ई-मेल प्रादेशिक परिवहन कार्यालयास प्राप्त झालेले आहेत .

यानुसार वायुवेग पथकांमधील मोटार निरीक्षक / सहा.मोटार वाहन निरीक्षक यांना एतद्वारे आदेशित करण्यात आलेले आहेत . यानुसार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात तपासणी दरम्यान खाजगी वाहनांवर पोलिस अथवा पोलिस बोध चिन्हे यांचा वापर केल्यास , दोषी आढणाऱ्या वाहनांवर वाहन अधिनियम 1988 व तद्नुषंगिक नियमांतील तरतुदीनुसार काटेकोरपणे कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

थोडक्यात सदर परिपत्रक निर्गमित झाल्यापासुन ,  यापुढे राज्य पोलिस अधिकारी / कर्मचाऱ्यांना देखिल आपल्या खाजगी वाहनांवर पोलिस अथवा पोलिस बोधचिन्हे अशा प्रकारचे फलक लिहता येणार नाहीत . याबाबत प्रादेशिक परिवहन विभाग मार्फत निर्गमित परिपत्रक पुढीलप्रमाणे आहे .

  • ताज्या बातम्या : आत्ताची काही प्रमुख चालु घडामोडी !

    ताज्या बातम्या : आत्ताची काही प्रमुख चालु घडामोडी !

    Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ latest news ] : आत्ताच्या काही प्रमुख चालु घडामोडी या लेखांमध्ये पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. तपोवन वाद : नाशिक कुंभमेळासाठी तपोवन येथे हजारो झाडे तोडली जात आहे , त्या विरोधात आता सयाजी शिंदे , राज ठाकरे , समाजसेवक रिंगणात उतरले आहेत . याशिवाय आता नागरिकांकडून देखिल सोशल मिडीयावर…


  • देशावर पेन्शन संकट वाढणार ; मिडीया रिपोर्ट !

    देशावर पेन्शन संकट वाढणार ; मिडीया रिपोर्ट !

    Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pension crisis will increase in the country; Media report ] : देशावर पेन्शनचे संकट वाढणार असल्साचा दावा मिडीया रिपोर्टने केला आहे . याबाबतचे ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो , तर पुढील 30 वर्षाच्या नंतर वृद्धांची संख्या वाढणार आहे . यामुळे…


  • दि.02 , 05 , 06 व 07 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा /महाविद्यालये , सरकारी कार्यालयांना सुट्टी !

    दि.02 , 05 , 06 व 07 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा /महाविद्यालये , सरकारी कार्यालयांना सुट्टी !

    Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Holidays for schools and colleges in the state on December 2nd, 5th and 6th ] : दिनांक 02 डिसेंबर , 05, 06 व 07 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा / महाविद्यालये तसेच सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे . दिनांक 02 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी : दिनांक 02 डिसेंबर रोजी…


Leave a Comment