संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृद्धी योजना राबविण्याकरीता प्रत्येक जिल्हा परिषदेवर 02 अशासकीय सदस्यांची निुयक्ती .

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ sant sevalal banjara tanda samrudhi yojana ] : संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृद्धी योजना मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद सर्व यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये 02 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करणेबाबत राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दिनांक 09 ऑगस्ट 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

ग्राम विकास विभागाच्या दिनांक 23.02.2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृद्धी योजना अंतर्गत करावयाच्या विविध कामाचा ग्राम पंचायतीकडून प्राप्त झालेल्या प्राधान्यक्रम व निकड लक्षात घेवून कामाची निवड करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद सर्व यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याची तरतुद आहे .

परंतु बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये प्रशासक कार्यरत असल्याने , सदर अशासकीय सदस्यांची नेमणूक शासन स्तरावरुन करणे आवश्यक असल्याचे दिसुन आले आहे . सदरची बाब विचारात घेवून मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व यांच्या अध्यक्षतेखालील समितीत अशासकीय सदस्यांची 03 वर्षाकरीता नेमणुक शासन स्तरावरुन करण्याची बाब शासनांच्या विचाराधीन होती .

सदर अशासकीय सदस्यांना बैठकीच्या दिवशी द्यावयांच्या दैनिक भत्ता व प्रवास भत्ता सदर योजनांच्या प्रशासकीय खर्चासाठी अनुज्ञेय असलेल्या 02 टक्के निधीमधून अदा करण्यात येणार असल्याने , संबंधित अशासकीय सदस्यांनी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

Leave a Comment