@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ sant sevalal banjara tanda samrudhi yojana ] : संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृद्धी योजना मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद सर्व यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये 02 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करणेबाबत राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दिनांक 09 ऑगस्ट 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
ग्राम विकास विभागाच्या दिनांक 23.02.2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृद्धी योजना अंतर्गत करावयाच्या विविध कामाचा ग्राम पंचायतीकडून प्राप्त झालेल्या प्राधान्यक्रम व निकड लक्षात घेवून कामाची निवड करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद सर्व यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याची तरतुद आहे .
परंतु बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये प्रशासक कार्यरत असल्याने , सदर अशासकीय सदस्यांची नेमणूक शासन स्तरावरुन करणे आवश्यक असल्याचे दिसुन आले आहे . सदरची बाब विचारात घेवून मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व यांच्या अध्यक्षतेखालील समितीत अशासकीय सदस्यांची 03 वर्षाकरीता नेमणुक शासन स्तरावरुन करण्याची बाब शासनांच्या विचाराधीन होती .
सदर अशासकीय सदस्यांना बैठकीच्या दिवशी द्यावयांच्या दैनिक भत्ता व प्रवास भत्ता सदर योजनांच्या प्रशासकीय खर्चासाठी अनुज्ञेय असलेल्या 02 टक्के निधीमधून अदा करण्यात येणार असल्याने , संबंधित अशासकीय सदस्यांनी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
-
राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ State employees get 10 days paid leave for this work every 3 years; Know the government decision of the Finance Department ] : राज्य कर्मचाऱ्यांना वर्षातुन 10 दिवस खाली नमुद करण्यात आलेल्या प्रयोजनासाठी पगारी रजा अनुज्ञेय करण्यात येते . याबाबत वित्त विभागा मार्फत निर्गमित सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे…
-
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important Gazette issued for Zilla Parishad employees on 18.07.2025 ] : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांकरीता ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 18 जुलै 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन राजपत्र निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रकानुसार , नमुद करण्यात आलेले आहेत कि , महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा…
-
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Modi government’s important decision regarding leave for government employees; Information given in Parliament. ] : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे . या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सलग 30 दिवसांची भरपगारी रजा मिळणार आहे . सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजे संदर्भात संसदेत प्रश्न विचाराण्यात आलेला होता…