@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee mahagai Bhatta shasan nirnay finance department ] : राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून आज दिनांक 10 जुलै रोजी जीआर निर्गमित करण्यात आला असून , सदर जीआर नुसार राज्यातील शासकीय त्याचबरोबर इतर पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर 50 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आला आहे .
महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी यांना माहे 01 जानेवारी 2024 पासून वाढीव 04 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आली आहे , यामुळे आता राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 46 टक्के वरुन 50 टक्के झाला आहे . सदर डी.ए वाढीचा निर्णय हा केंद्र शासनांच्या धर्तीवर घेण्यात आला आहे .
सहा महिन्याच्या डी.ए फरकाची रक्कम मिळणार : सदर महागाई भत्ता वाढ ही 01 जानेवारी 2024 पासुन लागु करण्यात आलेली असल्याने , माहे जानेवारी ते जुन या 06 महिने कालावधीमधील डी.ए फरकाची रक्कम ही रोखीने माहे जुलै महिन्यांच्या वेतनासोबत अदा केली जाणार आहे .
वाढीव डी.ए जुलै महिन्याच्या वेतनासोबत रोखीने : सदर 50 टक्के महागाई भत्ता वाढ माहे जुलै महिन्यांच्या वेतन देयकासोबत रोखीने अदा केले जाणार असल्याचे सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत .
सदर डी.ए वाढ राज्यातील जिल्हा परिषदा , तसेच अनुदान प्राप्त संस्थामधील कर्मचाऱ्यांना देखिल सदर महागाई भत्ता वाढीचा लाभ लागु करण्यात येणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . सदर डी.ए वाढीमुळे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये मोठी वाढ होणार आहे .
-
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 20 विजयी आमदारांची यादी ; जाणून घ्या सविस्तर..
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ shivasena (UBT) all winners aamadar list ] : विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाला असून , यामध्ये महाविकास आघाडी मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाला 20 जागेवर विजय संपादन करता आले आहे . सदर वीस विजय आमदारांची यादी खालील प्रमाणे पाहू शकता .. त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला…
-
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 मध्ये “या” दिग्गज नेत्यांचा झाला मोठा पराभव !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ maharashtra vidhansabha election results update] : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर झाला आहे , या निवडणुकीमध्ये काही दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे , अशा उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे जाणून घेऊया .. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण…