मराठा आरक्षणाचे उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांची राज्यातील सर्वच आरक्षण रद्द करण्याची मागणी !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ all reaservation stop demand from manoj jarange patil ] : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागील 2 वर्षांपासुन उपोषण , आंदोलन करणारे उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील , यांनी नुकतेच पत्रकारांशी बोलताना सांगितले कि , राज्यातील सर्वच जातींना देण्यात आलेले आरक्षण रद्द करावेत अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे .

मराठा समाजातील कुणबी – मराठा नोंदी असणाऱ्यांना आरक्षण देण्यात आले आहेत , तसेच सगे- सोयरेची बाब शासनांने मान्य केली नाही , तसेच सदरचे आरक्षण हे खोट असून , मराठांना सर्व प्रकारचे आरक्षण दिले गेले नाहीत . अशी भूमिका मांडत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे . मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांच्या कडून पहिल्यापासुन करण्यात येत आहेत .

परंतु या मागणीस ओबीसी समाजाकडून विरोध करण्यात येत असल्याने , राज्य शासनांवर दबाव पडत आहे . सध्या राज्यांमध्ये मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले गेले आहेत , परंतु सदरचे आरक्षण न्यायालयापुढे टिकणार नाही , अशी भिती जरांगे पाटलांना देखिल आहे . यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन मिळाल्यास , आरक्षण सुरक्षित राहील याकरीता , ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे .

अथवा ओबीसीमध्ये सन 1994 साली समाविष्ट करण्यात आलेल्या 350 जातीचे सर्वच आरक्षण रद्द करावेत , अशी मागणी करण्यात आली आहे , तसेच त्यावेळी सदर जातींना ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी नेमके कोणते निकष लावण्यात आले होते ,असा प्रश्न देखिल उपस्थित केला आहे .

डॉ.बाबासाहेब यांनी संविधानांमध्ये दिलेले आरक्षण वगळता सर्वच जातीचे आरक्षण रद्द करावेत , अशी मागणी करण्यात आली आहे , मागील शासकीय नोंदी पाहिले असता , ब्राम्हण व मुस्लिम यांना देखिल ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण दिले पाहीजे असे यावेळी जरांगेनी नमुद केले आहेत . घटनेत नमुद आरक्षण वगळता वरील 16 टक्के आरक्षण रद्द करण्याची मागणी केली आहे .

Leave a Comment