स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बार्टीमार्फत प्रशिक्षण योजना (शिष्यवृत्ती) ! दरमहा मिळेल 10 हजार रूपये..

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ barti scholarship for MPSC/ UPSC and other competative exam preparation student ] : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बार्टी संस्थामार्फत पूर्व परीक्षांकरिता प्रशिक्षण योजना राबविण्यात येते , याकरिता या वर्षासाठी दिनांक 3 जुलै पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्याचे आव्हान करण्यात आली आहे .

बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे यांच्याकडून दिलेल्या माहितीनुसार , स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीसाठी ,  राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी च्या निर्णयानुसार ( GR ) महाराष्ट्र लोकसेवा आयोग ,  केंद्रीय लोकसेवा आयोग , बँकिंग स्पर्धा परीक्षा , पोलीस भरती , सैन्य भरती इत्यादी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण नामांकित संस्थांच्या माध्यमातून देण्याचे कार्यक्रम राबवण्यात येते .

सन 2024- 25 या वर्षामध्ये विविध वरील नमूद स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी http://www.barti.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 3 जुलै 2024 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल,  निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा विद्यावेतन व एकरकमी निधी देखील अदा करण्यात येईल .

यामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच नागरी सेवा परीक्षा (UPSC ) साठी प्रशिक्षण म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रतिमहा 13,000/- रुपये इतके विद्यावेतन त्याचबरोबर एकरकमी आकस्मित निधी देण्यात येते . तर महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC ) राज्य सेवा परीक्षा , अभियांत्रिकी सेवा परीक्षा ,पोलीस भरती , सैन्य भरती इत्यादी स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा दहा हजार रूपये इतके विद्यावेतन व एकरकमी आकस्मित निधीची तरतूद करण्यात आलेली आहे ..

याशिवाय भारतीय रेल्वे , भारतीय आयुर्विमा महामंडळ, बँकिंग  अशा प्रकारच्या परीक्षांसाठी पूर्व प्रशिक्षण म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रतिमहा 6,000/-  रुपये विद्या वेतन व एकरकमी आकस्मित निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक श्री.वारे यांनी दिले आहेत.

Leave a Comment