@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Rain Update upto 10 Jun ] : राज्यात दिनांक 10 जुन 2024 पर्यंत पावसाचा प्रवास सुरु होणार आहे , आज दिनांक 02 जुन पासुन राज्यातील कोकण / पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हातुन पाऊस पुढे सरकारणार असून येत्यो 10 जुन पर्यंत पाऊस विदर्भ पर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञा पंजाबराव डख यांनी दिला आहे .
दिनांक 02 जुन रोजी सातारा , सांगली , पुणे , नगर , नाशिक , सोलापुर , लातुर , धाराशिव कोल्हापुर ,अहमदनगर तसेच कोकणातील सर्व जिल्हे या जिल्ह्यातुन पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे , तर दि.04 जुन ते 06 जुन दरम्यान हा पाऊस हळुहळु पुढे सरकत जाणार असून या कालावधीमध्ये पाऊस हा छत्रपती संभाजीनगर ,बीड , परभणी , नांदेड , जालना , जिल्ह्यावरुन पाऊस हा विदर्भांमध्ये आगमन करणार आहे .
प्रथम हा पाऊस हा यवतमाळ जिल्ह्यातुन एन्ट्री करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . त्यानंतर 07 ते 10 जुन दरम्यान पाऊस हा संपुर्ण विदर्भामध्ये पुढे सरकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .
या दरम्यान चांगला पाऊस झाल्यास जमिनीतील ओल तपासून एक वित ओलावा झाल्यास ,पेरणीस सुरुवात करावी असे पंजाबराव डख यांनी आपल्या ऑफीशियल चॅनेल ( युट्युब ) माध्यमातुन सांगतले आहेत .
यंदाच्या वर्षी राज्यांमध्ये दिनांक 15 जुन पर्यंत चांगला पाऊस ( पेरणी योग्य ) होण्याची शक्यता असल्याने , शेतीची मशागत करुन ठेवणे आवश्यक असल्याचे पंजाबरावांनी सांगितले आहेत .
-
सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ government employee extra pay bonus and mahagai Bhatta ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांचे अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकुण सॅलरीमध्ये मोठी वाढ झालेली आहे . सदरचा 40 दिवस बोनस चा लाभ सैन्य दलातील अधिकारी /…