@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Sanjay Gandhi Niradhar Yojana ] : संजय गांधी निराधार योजना ही योजना सरकारच्या सामाजिक न्याय विभाग ( Samajik ) अंतर्गत राबविण्यात येते , या योजनाबाबत आपणांस अधिक सविस्तर माहिती या लेखांमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत ..
या योजनाचे प्रमुख उद्देश : सदर संजय गांधी निराधार योजनांचे प्रमुख उद्देश म्हणजे समाजामधील दुर्बल घटकांना अर्थ सहाय्य करणे होय ..
सदर योजना अंतर्गत कोण- कोणास लाभ मिळतो ( लाभार्थी ) : सदरच्या योजना अंतर्गत दिव्यांग , विधवा , अनाथ , दुर्धर अजारग्रस्त , आत्याचारित महिला , देवदासी , तुरुंगातून शिक्षा भोगत असणाऱ्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नी , वेश्या व्यवसायातुन मुक्त महिला , 35 वर्षांवरील अविवाहीत निराधार स्त्री , इ. दुर्बल निराधार घटक लाभ घेवू शकतील ..
योजनाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : सदरच्या योजना अंतर्गत आपणांस वयाचा दाखला यांमध्ये किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 65 वर्षे दरम्यान तर 18 पेक्षा कमी वय असणाऱ्या लाभार्थ्यांना पालकांमार्फत लाभ दिला जाईल , तसेच राज्यांमध्ये 15 वर्षांपासुनचा रहिवाशी दाखला , विधवा असल्यास पतीचा मृत्यु दाखला , दिव्यांग असल्यास जिल्हा शल्य चिकित्सकांचा ( किमान 40 टक्के अपंग ) दाखला , अनाथ दाखला ..
तसेच उत्पन्नाचा दाखला , दुर्धर आजार प्रमाणपत्र , दिव्यांगाकरीता वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 50,000/- रुपये तर इतर सर्व लाभार्थ्यांकरीता कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 21,000/- रुपये इतकी असेल , तसेच रेशनकार्ड , आधारकार्ड , निवडणूक ओळखपत्र , बँक पासबुक झेरॉक्स , रहिवाशी दाखला , पासपोर्ट फोटो ..
मिळणारे आर्थिक लाभ : सदर योजना अंतर्गत आपले अर्ज मंजुर झाल्यास लाभार्थ्यांस प्रतिमहा 1500/- रुपये इतके आर्थिक लाभ थेट बँक खात्यांमध्ये जमा केले जाते ..
अर्ज कसा करावेत ? : आपण जर या योजना अंतर्गत लाभ घेवू इच्छित असाल तर आपल्या तहसील कार्यालयाच्या सेतु केंद्र अथवा ऑनलाईन पद्धतीने https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर आवेदन सादर करावेत ..
-
पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Detailed A TO Z information about Operation Sindoor Surgical Strike on Pakistan ] : पाकिस्थानवर दिनांक 07 मे रोजी भल्या रात्री 1.05 वाजता ऑपरेशन सिंदुर अंतर्गत आतंगवाद्यांचे तब्बल 9 अड्डे उद्धवस्त केले आहे . सर्जिकल स्ट्राईक केलेले पाकिस्थानातील 9 ठिकाणे कोणते ? : भारताने सर्जिकल स्ट्राईक केलेले पाकिस्थानातील…
-
सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
Spread the loveKhushi Pawar ( Gold Rate News ) : सोने खरेदीदारांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे . सोन्यामध्ये केलेली गुंतवणुकी ही सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते . भारताने काल दिनांक 07 मे रोजी केलेल्या हवाई हल्ला ( सर्जिकल स्ट्राईक ) ऑपरेशन सिंदुर…
-
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
Spread the loveKhushi Pawar प्रतिनिधी ( Employee News ) : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना एकाच वेळी 02 आर्थिक लाभ मिळणार आहेत . यामुळे एकूण पगारात ( Grass Salary ) मध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे . राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव भत्ते लागु केले जातात , ज्यांमध्ये महागाई भत्ता , घरभाडे भत्ता , वाहन भत्ता…