राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Regarding implementation of this scheme for state employees; GR issued by Finance Department on 30.06.2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांना निर्णयांमध्ये नमुद योजना लागु करणेबाबत , वित्त विभागांकडून दिनांक 30.06.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य सरकारी कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना लागु करण्यात आली आहे. सदरची योजना अंतर्गत विमा दाता दाखल करताना शासन निर्णय दिनांक 11 ऑगस्ट 2017 रोजीच्या शासन निर्णया मधील जोडपत्र – 05 …

मध्ये विहीत करण्यात आलेल्या कागदपत्रे सादर करणे आवश्क आहे . तथापि सदर विमा दावे अदा करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेवून सदर जोडपत्रांमध्ये नमुद कागदपत्रासोबत पुढे नमुद करण्यात आलेल्या अटी / शर्तींचा समावेश करण्यात आला आहे .

01.यांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , जर कोणी सदस्याने नामनिर्देशन पत्र दिले नसेल अशा प्रकरणी त्याने दिलेल्या नामनिर्देशन पत्र पुर्णत : अथवा अंशत : अग्राह्य असेल तर वारस प्रमाणपत्र / उत्तराधिकार प्रमाणपत्र दाखल करण्याचे तसेच वारस प्रमाणपत्राप्रमाणे नमूद वारस दारापैकी विमादाता रक्कम उचित व्यक्तीस अथवा …

हे पण वाचा : केंद्र / राज्य कर्मचारी / पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता वाढ बाबत संक्षिप्त आढावा ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !

विभागून देणेकरीता कार्य.दंडाधिकारी यांच्या समोर निर्गमित करण्यात आलेले संमतीपत्र 500/- रुपये च्या बॉन्ड पेपरवर व वारसदार अज्ञान असल्या प्रकरणी बंधपत्र 500/- रुपये स्टॅम्प पेपरवर दाखल करणे आवश्यक असणार आहे .

02.कागदपत्रे कार्यालयीन साक्षांकित करणे आवश्यक असेल , तसेच अपघात विमादाव्याची रक्कम योजना सदस्य / नामनिर्देशित व्यक्तीस प्रदान करण्याकरीता त्यांच्या रद्द करण्यात आलेल्या मूळ धनादेश ज्यावर लाभार्थी नाव असणे आवश्यक असेल .

03.SDM VERDICT व अंतिम तपासणी अहवाल / चार्जशी व ती दाखल करण्यात आली नसल्यास , आकस्मित मृत्यु झाल्याची दाखल करण्यात आले असल्यास उप-विभागीय दंडाधिकारी यांचा आदेश सादर करणे आवश्यक असेल .

04.विमा अधिनियम 1938 कलम 64 चे नियम काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल . जर विमा वर्गणी कपात नसेल , अशा प्रकरणी , विमा दावा ग्राह्य धरला जाणार नसल्याचे नमुद करण्यात आले आहे .

Leave a Comment