राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या या भत्यात मोठी वाढ ; शासन निर्णय निर्गमित दि.20.06.2025

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Big increase in this allowance of state officers/employees; Government decision issued on 20.06.2025 ] : सामान्य प्रशासन विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार , गणवेश भत्यांमध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे .

सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार उप-विभागाच्या अधिनस्त असणाऱ्या राज्य अतिथीगृहातील कर्मचाऱ्यांना पुरविण्यात यावयाच्या गणवेशाच्या वित्तीय मर्यादेत सुधारणा करण्याची बाब शासनांच्या विचाराधीन होती .

या निर्णयांनुसार सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत राजशिष्टाचार उप-विभाग मध्ये कार्यरत राज्य अतिथीगृहातील अधिकारी व कर्मचारी यांना 02 वर्षातून एकदा दिला जाणारा प्रति कर्मचारी एकुण तीन गणवेश खाली नमुद करण्यात आलेल्या सुधारित दराने मंजूर करण्यात येत आहे .

पदनामवित्तीय मर्यादा प्रति कर्मचारी / प्रति गणवेश ( रुपये )सुधारित वित्तीय मर्यादा प्रति कर्मचारी / प्रति गणवेष ( रुपये )
व्यवस्थापक6500/-9000/-
सहा.व्यवस्थापक6500/-8450/-
मुख्य बटलर6500/-8450/-
भांडारपाल6500/-8450/-
बटलर4500/-5850/-
खानसामा4000/-5200/-
किचन हेल्पर3000/-3900/-
स्टोअरमन3000/-3900/-
शिपाई3000/-3900/-

हे पण वाचा : दि.19 जुन रोजी राज्य अधिकारी / कर्मचारी संदर्भात 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) ; पाहा सविस्तर !

वरीलप्रमाणे गणवेश भत्यात सुधारणा करण्यास परवानगी देण्यात आली आहे . सदर सुधारणा अटी / शर्तींच्या अधीन राहून मंजूर करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे .

Leave a Comment