अधिकारी / कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करणेकरीता अनुदान वितरण GR निर्गमित ; जिल्हा निहाय अनुदान वितरण GR दि.02.06.2025

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR issued for distribution of grants for payment of salaries and allowances of officers/employees ] : अधिकारी / कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करणेबाबत , सन 2025-26 करीता जिल्हा निहाय अनुदानाचे वितरण करण्यात आलेले आहेत , या संदर्भात ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 02.06.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा – प्रशासन मधील कार्यरत अधिकारी / कर्मचारी योचे वेतन / भत्ते अदा करण्यासाठी आवश्य‍क प्रतिमहा वेतन त्यांच्याकडील शिल्लक निधी विचारात घेवून सन 2025-26 करीता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मधील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करण्यासाठी 6,60,00,000/- रुपये ( अक्षरी – सहा कोटी साठ लाख रुपये फक्त ) इतका निधी ..

मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून वितरण करण्यास मंजूरी देण्यात येत आहे . जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा , जिल्हा व वितरीत निधीचे विवरण पत्र सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

सदरचे अनुदान हे ज्या प्रयोजन करीता मंजूर करण्यात आलेले आहेत , त्याच प्रयोजन करीता खर्च करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . खर्च करण्याचे लेखाशिर्ष यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहे .

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment