@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 17 lakh state employees and 12 lakh pensioners in the state have been given an additional 2 percent dearness allowance increase. ] : राज्यातील तब्बल 17 लाख सरकारी कर्मचारी व 12 लाख पेन्शन धारकांसाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर 2 टक्के महागाई भत्ता वाढ निश्चित झाला आहे .
जानेवारी 2025 पासुन डी.ए वाढ : दिनांक 01.01.2025 पासुन केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या महागाई भत्तामध्ये 02 टक्क्यांची वाढ लागु करण्यात आलेली आहे . सदर वाढीव डी.ए आता राज्य कर्मचाऱ्यांना निश्चित झाला आहे .
राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर डी.ए : केंद्र सरकार ज्या प्रमाणात महागाई भत्ता वाढ करते , सदर प्रमाणात राज्यातील सरकारी / निमसरकारी कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर पेन्शन धारकांना लाभ लागु करण्यात येत असतो .यामुळे आता राज्यातील कर्मचारी / पेन्शन धारकांना डी.ए मधील 2 टक्के वाढ निश्चित झाली आहे .
हे पण वाचा : नवीन पेंशन विधेयक मंजुर , जाणून घ्या सविस्तर..
एकुण महागाई भत्ता : सध्या राज्य कर्मचाऱ्यांना माहे एप्रिल 2024 पासुन 53 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे , तर आता माहे जानेवारी 2025 पासुन 02 टक्के वाढीव डी.ए मुळे एकुण महागाई भत्ताचे दर हे 53 टक्के वरुन 55 टक्के टक्के इतके होणार आहे .
पेन्शनधारकांना मिळणार लाभ : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील पेन्शन धारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना वाढीव महागाई भत्ताचा लाभ मिळणार आहे .
आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- बदली संदर्भात ग्रामविकास विभाग मार्फत आत्ताचे नविन परिपत्रक निर्गमित दि.30.05.2025
- राज्य अधिकारी / कर्मचारी संदर्भात दि.30 मे 2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी महत्वपुर्ण / लाभदायक शासन निर्णय निर्गमित GR दि.27.05.2025
- पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी धक्कादायक बातमी ; संसदेत नविन वित्तीय कायदा 2025 मंजुरीनुसार डी.ए व वेतन आयोगावर रोख !
- निवृत्त / स्वेच्छा निवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन थकबाकी मंजूर ; जाणून घ्या सविस्तर निर्णय .