@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Provision of a fine of Rs. 1000/- per day for officers/employees who delay in doing work. ] : महाराष्ट्र शासन मार्फत देण्यात येणाऱ्या ऑनलाईन सेवा कामकाजांमध्ये कोणी अधिकारी / कर्मचाऱ्यांचे दिरंगाई केल्यास , सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांना रोज 1000/- रुपये दंडाची तरतुद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
महाराष्ट्र शासन मार्फत एकुण 1027 सेवा ह्या अधिसुचित करण्यात आलेले आहेत , या 1027 सेवांपैकी आपले सरकार पोर्टलवर 527 सेवा ह्या ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत .
तर सदर कामकाज करताना दिरंगाई करणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल आहेत . दंडाची रक्कम देखिल निश्चित करण्यात आली असून , दररोज 1000/- इतका दंड आकारण्याचे निर्देश दिले आहेत . या संदर्भातील अधिकृत्त परिपत्रक संबंधित मुख्य सचिव यांच्यामार्फत निर्गमित करण्यात येणार आहेत .
याबाबत दिनांक 17 एप्रिल रोजी मंत्रालय दालनात राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आलेली होती . सदर बैठकीमध्ये सदरचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे .
15 ऑगस्ट पर्यंत सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने राबविण्याचे उद्दिष्टे : राज्य सरकारकडून ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणारे उर्वरित सेवांपैकी 138 सेवा ह्या दिनांक 31.05.2025 पर्यंत तर उर्वरित सेवा ह्या दिनांक 15.08.2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने राबविण्याचे सरकारचे उद्दिष्ट्ये आहे .
आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.04.12.2025
- कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण “राईट टु डिस्कनेक्ट – 2025” विधेयक लोकसभेत सादर ; कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा !
- दीर्घकालीन सुट्या उपभोगणाऱ्यांना अर्जित रजेचा लाभ ; मा.आ.सुधाकर अडबाले यांच्या प्रयत्नांस यश !
- ताज्या बातम्या : आत्ताची काही प्रमुख चालु घडामोडी !
- देशावर पेन्शन संकट वाढणार ; मिडीया रिपोर्ट !
