मराठा समाजाकरीता राज्य शासनांकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व त्याकरीता शासनांची भरीव निधीचा दिलासा !

Spread the love

@marathiprasar बालाजी पवार प्रतिनिधी : राज्य शासनांकडून मराठा समाजाच्या उन्नतीसाठी विविध योजना राबविण्यात येतात , ज्यांमध्ये मागील 02 वर्षांपासुन मराठा समाजाकरीता भरीव निधीची तरतुद करण्यात आलेली आहे . ज्यामुळे मराठा समातील लोकांना योजनांतुन मोठ्या प्रमाणात लाभ मिळालेला आहे .

डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना : या योजना अंतर्गत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणांसाठी निर्वाह भत्ता म्हणून तब्‍बल 3,79,373 विद्यार्थ्यांना 1,293 कोटी इतका निर्वाह भत्ता वितरीत करण्यात आलेले आहेत . तर राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती या योजना अंतर्गत राज्यातील व्यावसायिक शिक्षण घेत असणाऱ्या 17 लाख 54 हजार 494 विद्यार्थ्यांना 1,262 कोटी रुपये इतर निधी मंजूर करण्यात आले आहेत .

त्याचबरोबर सारथी गुणवंत विद्यार्थी या शिष्यवृत्ती योजना करीता 32,639 विद्यार्थ्यांना 31 कोटी रुपये इतकी निधीचे वितरण करण्यात आलेले आहेत . तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत वैयक्तिक तसेच गट कर्ज व्याज परतावा या योजना अंतर्गत 74,873 लाभार्थ्यांना 5,659/- कोटी रुपये इतके कर्जे मंजूर कर्जावरील 608.12 कोटी रुपये व्याज परतावा वितरीत करण्यात आलेले आहेत .

त्याचबरोबर मराठा समाजातील गुणवंत 75 विद्यार्थ्यांना परदेशांमध्ये उच्च शिक्षणाकरीता 21 कोटी रुपये इतक्या निधीचे वितरण करण्यात आलेले आहेत . या योजना अंतर्गत राज्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना प्रथमच लाभ प्राप्त होणार आहेत . तसेच स्वाधार योजना अंतर्गत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मध्ये मोठी वाढ लागु करण्यात आलेली आहे .

यांमध्ये महानगराच्या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्यांना 60,000/- रुपये तर विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी 51,000/- रुपये तर जिल्ह्याच्या ठिकाणी 43,000/- रुपये तर तालुक्याच्या ठिकाणी निर्वाह भत्ता म्हणून 38,000/- रुपये डीबीटी प्रणाली द्वारे वितरीत करण्यात येणार आहेत .

मागासलेपणा तपासण्याकरीता सर्वेक्षण अहवाल : मराठा समाजाचे मागासलेपण तपासणे कामी राज्य भरातुन सर्वेक्षण करण्यात येत आहेत , त्यानुसार सर्वेक्षणाचा अहवाल राज्याचे मुख्यमुत्री एकनाथ शिंदे यांना सुपुर्त करण्यात आलेला आहे .

Leave a Comment