Marathiprasar , बालाजी पवार प्रतिनिधी : आपण जर खाजगी क्षेत्रांत कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जीवन पाहिले असता , खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळा संपल्यानंतर देखिल बॉसचे फोन येतात , काम पुर्ण करण्यासाठी सांगतात . यामुळे बॉसचा कॉल्स आल्यास कर्मचाऱ्यांच्या मनात अचानक धडकी बसून जाते .
यामुळे कर्मचाऱ्यांचे रक्षण करणे याकरीता देशात राईट टु डिस्कनेक्ट या कायद्या अंतर्गत नविन विधेयक मांडण्यात येणार आहे . ज्यांमध्ये नमुद करण्यात येणार आहेत कि , जर कार्यालयीन वेळानंतर बॉसने कॉल्स अथवा ई-मेल केल्यास , बॉसला दंड देण्यात येणार असल्याची तरतुद केली जाणार आहे . कार्यालयीन वेळानंतर जर कर्मचारी हा आपल्या खाजगी काम करत असल्यास , त्यांना अचानक बॉसचा फोन आला तर कर्मचाऱ्यांच्या मनांमध्ये मोठी भिती निर्माण होते .
बऱ्याच वेळा काम पुर्ण न झाल्यास बॉसचे अनेक बोलणे कर्मचाऱ्यांना ऐकावे लागते . यामुळे कर्मचाऱ्यांना ऑफीस टाईम संपल्यानंतर देखिल कोणतेही कारण नसताना , त्रास सहन करावा लागतो . यामुळे अशा प्रकारच्या प्रकरणाला आळा बसावा , याकरीता देशांमध्ये नवा कायदा लागु करण्यात येणार आहेत . ज्यांमध्ये असे नमुद केली जाणार आहेत कि , जर बॉसने कार्यालयीन वेळा नंतर कर्मचाऱ्यांस कॉल अथवा मेल केल्यास करुन कामावरुन कमी करण्याची धमकी देत असल्यास , बॉसवरच दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे .
तर या नविन कायद्यांनुसार कर्मचाऱ्यांना ऑफीस टाईम व्यतिरिक्त बॉसचे कॉल्स अथवा मेल अटेंन करणे बंधनकारक असणार नाही . कारण ज्यावेळी कर्मचाऱ्यांची ड्युटी संपते त्यावेळी कर्मचारी हा कामातुन मुक्त होत असतो . यामुळेच कर्मचाऱ्यांचे हित जोपासण्याकरीता , ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये राईट टु डिस्कनेक्ट हा कायदा करण्यात आलेला आहे .
सदर कायद्या नुसार देशांमध्ये देखिल लवकरच या संदर्भातील विधेयक मांडून या संदर्भातील कायदा केला जाणार आहे . आस्ट्रेलिया या देशांमध्ये या संदर्भात कर्मचारी संघटनांकडून बऱ्याच दिवसांपासून या संदर्भात मागणी केली जात होती , अखेर ऑस्ट्रेलिया या देशाने कर्मचाऱ्यांच्या हिताचा कायदा लागु करण्यात आलेला आहे . तर असा कायदा जगांमध्ये फ्रान्स या देशांसह इतर 20 देशांमध्ये यापुर्वीच पासुनच असा कायदा अस्तित्वात आहे .